Home महाराष्ट्र एल. आर. बाली यांच्या निधनाने सच्चा भीमसैनिक हरपला : जयसिंग वाघ

एल. आर. बाली यांच्या निधनाने सच्चा भीमसैनिक हरपला : जयसिंग वाघ

87

✒️जळगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जळगाव(दि.6जुलै):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर अनुयायी , समता सैनिक दल पंजाब शाखेचे सदस्य , आर.पी.आय. पंजाबचे सचिव , भीम – पत्रिका चे संपादक , प्रसिद्ध हिंदी लेखक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सलग दहा वर्षे काम केलेले एल. आर. बाली यांचे ९८ व्या वर्षी आज ६ जुलै रोजी निधन झाले . बाली यांच्या निधनाने एक सच्चा भीम सैनिक हरपला असे मत प्रसिद्ध साहित्तीक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .

‌ एल. आर. बाली यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त करतांना जयसिंग वाघ यांनी सांगितले की, बाली यांनी जालंधर येथे आंबेडकरी चळवळ अत्यंत जोरात चालविली , ते बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू व जवळचे सहकारी होते , त्यांनी पंजाब राज्यात स्वतंत्र मजूर पक्ष , शेड्यूल कास्ट फेडरेशन , समता सैनिक दल व पुढं रिपब्लिकन पक्ष यात राज्यपातळीवर काम करुन आंबेडकरी विचार गावपातळीवर नेले , पंजाब राज्यात ही चळवळ बाबासाहेबांच्या नंतरही १९९० पर्यंत मोठ्या जोमाने काम करीत होती त्यात बाली हे आघड़ीवर होते . भीम पत्रिका हे साप्ताहिक त्यांनी सुरु केले ते भारतात व विदेशातही वितरित होत होते.

त्यांनी रंगीला गांधी हे पुस्तक लिहून देशात मोठी खळबळ वुडवून ‌दिली , बाली यांना त्या वेळेस जीवे ठार मारण्याच्या धामक्या आल्या पण ते घाबरले नाही . ते धाड़सी , करारी व जिद्दी होते . त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली असे वाघ यांनी प्रसिद्धि पत्रकात नमूद केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here