Home महाराष्ट्र बिटरगाव (बु) येथे प्रथमच महिला ठाणेदार सुजाता बनसोड रुजू

बिटरगाव (बु) येथे प्रथमच महिला ठाणेदार सुजाता बनसोड रुजू

129

( ढाणकी शहरातील पोलीस चौकी येथे पुढील वाटचालीसाठी पत्रकार बांधवांनी दिल्या शुभेच्छा)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 6 जुलै):-तालुक्यातील बिटरगाव (बु) पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढाणकी शहरातील पोलीस चौकी येथे आज दिनांक 5 जुलै रोजी नुकताच प्रभार हाती घेतलेल्या ठाणेदार सुजाता बनसोड यांना पत्रकार बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व ठाणेदार यांनी सुद्धा आपला परिचय करून दिल्यानंतर पत्रकार बांधवांनी सुद्धा आपण काम करत असलेल्या वर्तमानपत्रा बद्दल माहिती देऊन स्वतःचा परिचय दिला.

बिटरगाव (बू) पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांची यवतमाळ नियंत्रण कक्षात बदली झाल्याने त्यांचे ठिकाणी ठाणेदार म्हणून सुजाता बनसोड ह्या रुजू झाल्या आहेत.

अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी सुजाता बनसोड यांच्याकडे बिटरगाव (बु )पोलीस स्टेशनचे सूत्र सोपविले आहे.

ठाणेदार भोस यांची यवतमाळ नियंत्रण कक्ष येथे बदली झाली. पोलीस स्टेशन उमरखेड येथे कार्यरत असलेल्या ठाणेदार सुजाता बनसोड यांनी नुकतेच पदाचे सूत्र स्वीकारले.

सुजाता बनसोड यांनी उमरखेड पोलीस स्टेशनचे योग्यरीत्या काम सांभाळले तसेच उमरखेड शहराचा चागला अनुभव असल्यामुळे बिटरगाव (बु) ठाणे सांभाळताना त्यांना अडचण जाणार नाही हे मात्र विशेष.

अवैद्य धंदे फोफावणार नाही याची खबरदारी घेतली जाईल व बिटरगाव (बू) पोलीस स्टेशनच्या परिसरात मटका, जुगार, सुगंधी, तंबाखूची होणारी आयात याचे समूळ उच्चाटन करू आणि समाजाला घातक अशा शक्तींना आळा घालू असे सुद्धा यावेळी ठाणेदार म्हणाल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here