🔹दोषींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.5जुलै):-तालुक्यातील झालेल्या कोतवाल पद भरतीच्या परीक्षेदरम्यान पारदर्शकता दिसुन आली नाही. या अपारदर्शकता विषयावरून कोतवाल पद भरतीचे परीक्षार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कोतवाल पद भरतीच्या हक्कासाठी कोतवाल पद भरती मधील गैरव्यवहाराबद्दल चौकशी करून कोतवाल पद भरती परीक्षा रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी व दोषींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. या करीता पुन्हा एकदा रक्तविर सेना फाउंडेशन मार्फत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कोतवाल पद भरती परीक्षार्थ्यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षा केंद्रावरील समस्या उघड केल्या. कोतवाल पद भरतीचे परीक्षा शुल्क 300 रुपये आकारण्यात आले. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन प्रश्न पत्रिका ह्या डिजिटल स्वरूपाच्या असणे आवश्यक होत्या. परंतु प्रश्न पत्रिका ह्या एकदम खालच्या दर्जाच्या झेरॉक्स स्वरूपाच्या होत्या. प्रश्न पत्रिका वितरण करण्याअगोदर पेनाने प्रश्न पत्रिकेवर परीक्षार्थीचे बैठक क्रमांक लिहिण्यात आले होते.
एका परीक्षा केंद्रावर जेवढे परीक्षार्थी आहेत तेवढ्याच उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका त्या परीक्षा केंद्रावर पाठविल्या जातात. आणि परीक्षेच्या दरम्यान एखाद्या परीक्षार्थ्याने रोल नंबर टाकले आणि ते चुकले तर यास तो परीक्षार्थी स्वतः जवाबदार असतो. मात्र या परीक्षा क्रेंदावर रोल नंबर चुकले तर त्यांना उत्तरपत्रिका जास्त प्रमाणात असल्याने दुसऱ्या उत्तरपत्रिका देण्यात आल्या.
परीक्षा क्रेंद्रावर शिस्त असणे आवश्यक असते. किंबहुना ते दिसुन आले नाही.
सदर बाबींवरून कोतवाल पद भरती मध्ये गैव्यवहार झाल्याचे पुरेपूर दिसून येते आहे. या प्रकरणाची सकोल चौकशी करून ब्रम्हपुरी तालुक्यातील गरीब, होतकरू व उच्चशिक्षित परीक्षार्थ्यांना न्याय देण्यात यावा. तसेच हि कोतवाल पद भरती रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी. व दोषींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अशी निवेदनातून आर्त हाक रक्तविर सेना फाउंडेशनने जिल्हाधिकारी यांना केली.
यावेळी प्रामुख्याने निवेदन देतांना रक्तविर सेनेचे अध्यक्ष निहाल ढोरे, उपाध्यक्ष मायासिंग बावरी, सदस्य संदिप कामडी, रक्तविर सेना शाखा पिंपळगाव कार्य-प्रमुख सुरज तुपट, सचिन गुरनुले उपसरपंच मेंडकी,परीक्षार्थी राजेश्वर भुरके, सुरज मेश्राम, सचिन ठाकरे, वैभव मैंद, योगेश निकुरे उपस्थित होते.