✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
मुंबई(दि.28जून):-वरचेवर जितके व्यवहार ऑनलाईनवर वाढत जातील तितकेच यात फसवेगिरीचे प्रकारही वाढत जाणार. एक सापळा लक्षात आला की ती मंडळी तो बंद करून नवीन तयार करतात. अर्थात या सर्वामागे एकच सूत्र असते ते म्हणजे तुमच्या भावनेला हात घालून आधी कनेक्ट व्हायचं आणि मग योग्य वेळी लुटायच ! असाच एक नवीन फ्रॉड आज दाखवून देतोय. वर वर कुणाचा तरी मदत मागण्यासाठीचा मेसेज वाटावा असे या फ्रॉड चे स्वरूप असते किंवा एकलकोंड्या लोकांसाठी मैत्रीचा हात दाखवून रचलेला सापळा , काही असे व्हायरस असू शकतात जे या दिलेल्या नंबरला क्लिक करायला गेला की तुमच्या फोनमध्ये घुसून तुमचा फोन हॅक केला जातो.
हाही तिसरा प्रकारचा धोका या मेसेजमध्ये असू शकतो. आजकाल कौटुंबिक आणि सामाजिक सुद्धा संवाद कमी झालेत. जो तो स्वतःमध्ये आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये दंग आहे. आणि त्यातून येणारे एकटेपण व त्यातून वाढणारी निराशा.नेमक्या अशा लोकांसाठी मग “मैत्री” च्या गोंडस नावाखाली असे मेसेज पाठवले जातात. की आपण मैत्री करावी. मग गप्पा माराव्या. हि आपली सुप्त इच्छा इथं पूर्ण होईल अशी भाबडी आशा ठेवून तुम्ही मग या मेसेजमधील नंबर ला कनेक्ट होता अन तिथं तुमचं पहिलं पाऊल सापळ्याकडे पडलेलं असत.यातूनच नंतर तुम्हाला भावनेत गुंतवून नंतर सहानुभूतीचे जाळे पसरून त्यात आणले जाते आणि नंतर मग मांजराची नखे जशी योग्य वेळी बाहेर येतात तशी यांची लुटण्याची नखे बाहेर येतात. तर असे मेसेज नेमके खरे आहेत की फ्रॉड ? हे कसे ओळखायचे ?
तर मागेच मी म्हटल्याप्रमाणे “wait” हा गुरुमंत्र कामी येतो.असल्या मेसेज रिप्लाय देण्याची अजिबात घाई करायची नाही. वेटा न जरा ! जर समोरची व्यक्ती खरेच अडचणीत असून मदत मागण्यासाठी मेसेज करत असेल आणि तुम्ही रिप्लाय करतच नसाल तर ती व्यक्ती पुन्हा मेसेज करेल की, किंवा कॉल करेल. तेव्हा सत्य काय ते कळेल. आणि तुम्ही रीस्पॉन्डच काही केलं नाही तर ती समोरची व्यक्ती तुमचा नाद सोडून नवीन बकरा पकडायला जाते. फ्रॉड मेसेज आहे हे ओळखण्याची दुसरी एक आयडिया म्हणजे सगळं नीट बारकाईने वाचायच. नेमकं त्यात कुठंतरी गडबड सापडतेच. जशी या मेसेज मध्ये आहे.
मेसेज एका नम्बरवरून पाठवला आहे आणि कनेक्ट (कॉल) करण्यासाठी वेगळाच नंबर दिला आहे. (आता खरं सांगा…. तुमच्यापैकी कितीजणांना हे लक्षात आलं होत ? कारण तुम्ही फोटो आधी पाहून मग पोस्ट वाचायला घेतलीय न !) हे असं होत अनेकांचे ! घाईघाईत सगळं पाहण्याचीच जणू घाई असते. ते टाळा. बारकाईने नीट पाहिलं तर हा दोन दोन नंबरचा घोटाळा कळला असता आणि तुम्ही सावध झाले असते. आता यावर काहीजण म्हणतील की, आजकाल दोन दोन नंबर एकाकडे असू शकतात की ! एक कॉल साठी एक दुसऱ्या कामासाठी ! मलाही हे मान्य असलं तरी ती असे दोन दोन नंबर बाळगणारी व्यक्ती बिनकामाची पडीक नसते मैत्र्या करत सुटायला. शक्यतो दोन नंबर असलेली मंडळी पुरेशी परिपक्व असतात. त्यामुळे हे असे मेसेज म्हणजे सापळे आहेत हे लक्षात येईल.
अशा सापळ्यात न अडकण्याचे उपाय आहेत,अशा मेसेजकडे सरळ दुर्लक्ष करणे, अशा आभासी व अपरिचित लोकांशी मैत्री करून संवाद / गप्पा मारण्यापेक्षा आपल्या अवती भोवती असलेल्यामध्ये मिसळा. त्यांच्याशी गप्पा मारा. पुस्तकात मन रमवा. निसर्गात भटकायला जा. मग तुम्हाला आलेलं एकलकोंडेपणा नाहीसा होईल.त्यामुळे सावध राहा सतर्क राहा असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी, सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे सदस्य धनंजय देशपांडे, पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.