Home महाराष्ट्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज आदर्श विचार सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आदर्श विचार सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन.

64

 

कराड -राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारावरती काम सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज आदर्श विचार या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून इच्छुकांनी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी केले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारावरती सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा राजकारण विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणारे व्यक्तींचा राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने सन्मान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, रोख रक्कम, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक मंडळींनी आपल्या कामाची थोडक्यात माहिती, वर्तमानपत्रातील कात्रणे आणि फोटो सह सविस्तर माहिती सह पुरस्कारासाठी नामनिर्देशन पत्र सादर करावेत. असे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्तावातून काही निवडक मंडळींना शाहू महाराज जयंती चे औचित्य साधून गौरव करण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव विश्वास मोहिते, संस्थापक अध्यक्ष आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी (केसे) पोस्ट सुपने, तालुका कराड, जिल्हा सातारा या पत्त्यावर पाठवावेत.

अधिक माहितीसाठी मोबाईल नं.97 63 20 10 56 या व्हाट्सअप नंबर वरती संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here