Home महाराष्ट्र डोंगरयावली येथे जिओचे नेटवर्क मिळेना अन् फोन लागेना जिओ कंपनीची मोबाईल...

डोंगरयावली येथे जिओचे नेटवर्क मिळेना अन् फोन लागेना जिओ कंपनीची मोबाईल ची सेवा ठप्प ; नागरिक त्रस्त

95

 

दापोरी प्रतिनिधी:
मोर्शी तालुक्यातील डोंगरयावली येथे विविध कारणांमुळे जिओ मोबाइल कंपनिच्या ग्राहकांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल तक्रार कोणाला करायची याची माहिती नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोबाइलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे. फोर-जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळे टू-जीची सेवा मिळणे शेजारी-शेजारी फोन असताना देखील फोन न लागणे अशा विविध कारणांमुळे जिओ मोबाइल कंपनीच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्याच्या काळात मोबाइलशिवाय जगणे कठीण बनले आहे, त्यामुळे नाममात्र अपवाद वगळता सर्वाकडे मोबाइल असतोच. नागरिक त्यांच्या सोईनुसार विविध मोबाइल कंपन्यांची सीमकार्ड वापरतात. मात्र, अलिकडे मोबाइल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे जिओ कंपनीचे ग्राहक त्रासले आहेत. अनेकांशी संपर्क साधल्यानंतर मोबाइल कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा नागरिकांनी पाढाच वाचून दाखविला. या कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे आढळून आले.
अनेक वेळा मोबाइलचे नेटवर्क मिळत नसल्यामुळे फोन लागत नाही. दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला फोन केल्यास हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे सांगितले जाते. अनेक कार्यालयात व परिसरात नेटवर्क कमकुवत असल्यामुळे इंटरनेटला गती मिळत नाही.
नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा खूप त्रास होते. फोन सुरू असताना अचानक तो कट होतो, अनेक वेळा मधूनच नेटवर्क जाणे आणि नंतर मिस कॉल अलर्ट येणे, कमकुवत नेटवर्कमुळे इंटरनेटला सुविधा योग्य न मिळणे..वॉट्स अ‍ॅप मध्येच थांबणे. इंटरनेटला गती न मिळणे असे प्रकार घडतात. कॉल ड्रॉप, अचानक रेंज जाणे, इंटरनेटची फोर-जी सेवा घेतली असताना ती न मिळणे याबाबत चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर व्यवस्थित उत्तर मिळत नाही.
मागील गेल्या ६ महिन्यापासून मध्ये-मध्ये रेंज जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कामाच्या वेळात खूप त्रास होतो. सोबत दुसऱ्या कंपनीचे एक कार्ड वापरावे लागते . कधी-कधी फोन न लागणे, इंटरनेटला स्पीड कमी असणे किंवा मध्येच इंटरनेट बंद होणे, असे प्रकार घडतात.’
फोन न लागणे, रेंज न मिळणे. इंटरनेट स्पीड नसणे. दुसऱ्या व्यक्तीला नंबर अस्तित्वात नसल्याचे सांगणे, असा त्रास नागरिकांना सातत्याने होत असल्यामुळे जिओ कंपनी विरोधात डोंगर यावली येथील नागरिकांमध्ये रोष निर्माण होत असून तत्काळ मोबाईल सेवा सुरळीत करण्याची मागणी डोंगरयावली येथील नागरिकांनी जिओ कंपनीला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here