✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.19जून):-शासनाच्या कोणत्याही योजना लोकांच्या कल्याणासाठी असतात. त्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना झाल्यास सामाजिक प्रगती होत असते. सामान्य माणूस हाच व्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो. जोपर्यंत शासन आणि जनता यांच्यात समन्वय होत नाही, तोपर्यंत सामूहिक विकास होणार नाही. त्यामुळे लोकांच्या गरजा ओळखून काम करा. त्यांना मदत करा. लाभ मिळवून द्या. आपल्या केंद्रामार्फत शासकीय योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, याची काळजी घ्या, अशा शब्दात गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शासकीय योजना मोफत मदत केंद्र व उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
आ.डॉ.रत्नाकर गुट्टे संचलित शासकीय योजना मोफत मदत केंद्र आणि महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पूर्णा शहरातील डॉ.झाकीर हुसेन सभागृहात शहरी व ग्रामीण भागातील १२७ कामगारांना सुरक्षा किटचे वाटप आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, शासकीय योजनात होणारा भ्रष्टाचार दूर करण्यासाठी हे केंद्र सुरू केले आहे. त्याच्या शाखा गंगाखेड, पालम आणि पूर्णा येथे आहेत. त्यातून हजारो लोकांना फायदा होत आहे. लोकांचा वेळ, धावपळ आणि पैसा वाचत आहे. याचे मला विशेष समाधान आहे.यावेळी मित्र मंडळाचे जिल्हा सरचिटणीस रवि भाऊ कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर, तालुकाध्यक्ष गणेश कदम, रासपचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ रेंगडे, नवनाथ भुसारे, उत्तमराव ढोणे, नंदकुमार डाकोरे, घाटोळ मामा, विश्वनाथ होळकर, नवनाथ जगाडे, नारायण मोरे, व्यंकटेश पवार, तालुका मिडीया प्रमुख दत्तराव पौळ, शरद जोगदंड, रफिक भाई पठाण, मुकुंद भोळे, विकास घासले, मुसा भाई, असलम खान पठाण, अभिजीत चक्के, अश्विन कदम, शिवशंकर मुंढे, बालाजी मुंढे, ऋषिकेश बनवसकर, सचिन राठोड यांच्यासह विविध पदधिकारी कार्यकर्ते लाभार्थी महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर शहराचा कारभार सुतासारखा सरळ करीन पूर्णा शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ते, नाली, पाणी, आरोग्य, शिक्षण सारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. जाऊ तिथे खाऊ हि प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात नगर परिषद माझ्याकडे द्या, कारभार सुतासारखा सरळ करीन, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी सांगितले.म्हणून तुमचे अश्रु पुसणे माझं कर्तव्य आहे.मी इथं तुमच्यामुळे उभा आहे. आयुष्यात आलेलं वादळ तुमच्या खंबीर साथीमुळे दूर करता आले. संकटांशी लढता आले. कारण, तुम्ही माझी ढाल झाला होतात. त्यामुळे मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे. तुमची सुख-दु:खे माझी आहेत. म्हणून तुमचे अश्रु पुसणे माझं कर्तव्य आहे, असे बोलताना आ.डॉ.गुट्टे भावुक झाले होते.