Home महाराष्ट्र 23 जुन रोजी गेवराई तहसील वर गायरान जमीन नोटीस प्रकरणी भव्य मोर्चा...

23 जुन रोजी गेवराई तहसील वर गायरान जमीन नोटीस प्रकरणी भव्य मोर्चा – अनिल तुरुकमारे

110

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.19जून):-तालुक्यात ग्रामपंचायत हद्दीत गायराण धारकांना व सरकारी जागेवर घरे बांधलेल्या गोर गरीब कुटुंबांना जागा रिकाम्या करण्याच्या नोटिसा तहसीलदार गेवराई यांनी पाठवल्या आहे. सदरील नोटिसा तात्काळ रद्द करण्यात याव्यात तसेच इतर मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी गेवराई तालुक्याच्या वतीने पंचायत समिती कॉर्नर ते तहसील कार्यालय गेवराई भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे बीड जिल्हाध्यक्ष अनिल तूरुकमारे व गेवराई तालुकाध्यक्ष अशोक सटले यांनी पत्रकार परिषदेत निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की शासनाने गायरण धारक तसेच सरकारी जागेवर घर बांधलेल्या कुटुंबांना तहसीलदार यांनी जागा रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात. तसेच गेवराई शहरात अनेक वर्षांपासून संजय नगर, भीम नगर, साठे नगर, संघमित्र नगर, अचानक नगर या ठिकाणी शेकडो कुटुंब हे अनेक वर्षांपासून साधारण घरे बांधून राहत आहेत. परंतु शासनातर्फे त्यांना अद्याप पर्यंत पि.टि.आर. दिलेले नाहीत. त्या मुळे त्यांना नगर परिषद कडून पंतप्रधान घरकुल योजना तसेच रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही.

त्या मुळे त्यांना तात्काळ पी. टी.आर देण्यात येऊन घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात अक्षय भालेराव हत्याकांड, रेणापूर जिल्हा हत्याकांड, दादर मुंबई येथील वसतिगृहात मागासवर्गीय भगिनीची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी साठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे २३ जून रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कॉर्नर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय भव्य मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या मोर्चात गायरान धारक, अतिक्रमण धारक तसेच सर्व स्थरातील बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here