सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
महागाव (दि.16जून):-पंचायत समिती महागाव अंतर्गत 12 शाळेवर व पंचायत समिती उमरखेड अंतर्गत 8 शाळेवर एकही शिक्षक नाही तथापि शून्य शिक्षकी शाळा बऱ्याच वर्षापासून आहेत त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान प्रचंड होत आहे.
एकीकडे स्पर्धेचे युग असताना विद्यार्थ्यांना शिकविण्यास शिक्षक नाही त्यामुळे शिक्षक विना शिकावे लागते त्यामुळे ही बाब यवतमाळ जिल्ह्याला शरमेची बाब आहे तरी महोदयांनी पंचायत समिती महागाव मधील 12 शून्य शिक्षकी शाळा व पंचायत समिती उमरखेड अंतर्गत 08 शून्य शिक्षकी शाळेवर सर्वात अगोदर कंपल्सरी स्वरूपात जागा तात्काळ भरण्यात याव्यात यानंतर दुसऱ्या जागा भराव्यात त्यामुळे जर पंचायत समिती महागाव व पंचायत समिती उमरखेड शून्य शिक्षिकी शाळेमध्ये शिक्षक न दिल्यास भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड व स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व या उद्भवलेल्या परिस्थितीला आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
या संदर्भात निवेदन देताना भाजप अ.जा.मोर्चा जिल्हाध्यक्ष भाविक भाऊ भगत सत्यजित भोयर सुशांत वंजारे भाऊसाहेब शिंदे.यावेळी उपस्थित किशोर पागोरे शिक्षणाधिकारी यवतमाळ विस्तार अधिकारी रामदासजी केंद्र सर मारोती मडावी सर BEO महागाव व सतिश दर्शनवाड सर BEO उमरखेड यांना निवेदन देण्यात आले आहे.