Home लाइफस्टाइल यवतमाळ जिल्ह्यातील वैष्णवी राठोड हिने NEET परीक्षा मध्ये मारली मजल

यवतमाळ जिल्ह्यातील वैष्णवी राठोड हिने NEET परीक्षा मध्ये मारली मजल

131

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

महागाव (दि.15 जून) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेल्या अत्यंत ग्राम खेड्यातून व प्रतिकूल परिस्थितीत आजही गावगाडा असणाऱ्या पोखरी तांडा येथील कुमारी वैष्णवी राठोड हिने नीट परीक्षा 2023 मध्ये 720 पैकी 700 गुणांकन मिळवून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला तिचे तमाम बंजारा समाज व इतर समाजाच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन तसेच महागाव तालुक्यातील ईजणी येथील भुमीका अवधुत पानपट्टे हिने 720 पैकी 628 गुण प्राप्त करुण इतिहास घडविला सदर सावित्रीच्या लेकींनी अत्यंत प्रतिकूल अवस्थेत व कसल्याही प्रकारची सोय सुविधा नसताना आज इतिहास घडविला त्याबद्दल वैष्णवी भूमिका यांनी विदर्भातील कन्या ह्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे गुणांकन प्राप्त करून त्यांनी इतिहासाला उजाळा करून दिला त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे महाराजा छत्रपतीची आई माँ जीजाऊ विदर्भ कन्या होती तसेच कृष्णाची रुक्मिणी ही विदर्भ कन्या होती.

नळ दमयंती दमयंती ही विदर्भ कन्या होतीया अशा ह्या विदर्भाच्या कन्यांनी आदर्श निर्माण करून इतिहास घडविला त्यापैकी वैष्णवी व भूमिका यांनी इतिहासाची आठवणीला उजाळा करून दिला अशा ह्या कन्यारत्नाला विदर्भाच्या तमाम समस्थांचा मानाचा मुजरा ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here