सचिन सरतापे (प्रतिनिधी मसवड) मोबाईल 9075686100
म्हसवड : नांदेड जिल्ह्यातील तरुण अक्षय भालेराव याचा खून खटला जलद गती न्यायालयात चालवावा आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशा विविध मागण्यांसाठी मान तालुक्यातील बहुजन समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचा व विविध पदाधिकारी संघटनांचा माजी सभापती बाळासाहेब रणपिसे यांच्या नेतृत्वात मान तहसीलवर काल मोर्चा निघाला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे गेल्याच वर्षी देशाने स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला स्वातंत्रता समता बंधुता धर्मनिरपेक्षता हे भारतीय संविधानाने दिलेली मूल्य आपण स्वीकारले आहेत या देशाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे इत्यादी समाज सुधारकांचा व संत परंपरेचा वारसा आहे तरीसुद्धा जातीच्या व धर्माच्या नावाखाली मागास, आदिवासी, भटके, अल्पसंख्याक व महिला यांच्यावर अत्याचार व अन्याय होतच आहे हे अत्यंत शरमेची बाब आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून नांदेड जिल्ह्यातील बोंडार (भीम नगर) गावातील भीमसैनिक अक्षय भालेराव या युवकाची अत्यंत निर्गुण पणे हत्या केली ही माणुसकिला काळीमा फासणारी गोष्ट आहे यावरून हे स्पष्ट होते की या राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही व जातीवाद काही लोकांच्या डोक्यातून गेलेला नाही अशा जातीयवादी व धर्मांध गाव गुंडांना मिळणारा राजकीय आश्रय अत्यंत धोकादायक आहे ही मानवी हक्काची आणि घटनेची पायमल्ली आहे या देशातील सर्वसामान्य नागरिक लोकांना सुरक्षित जीवन जगता येत नाही या देशाची वाटचाल लोकशाहीच्या मार्गाने होण्याऐवजी धर्मांध व हुकूमशाही पद्धतीने चाललेल्या आहे या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचारून अक्षय भालेराव यांच्या हत्येचा तपास योग्य रीतीने होणे आवश्यक आहे व जलद गती न्यायालयात खटला चालवून अक्षय च्या मारेकरांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा लवकरात लवकर मिळावी अशी आम्ही मागणी करत आहोत
या हत्येचा आम्ही तीव्र निषेध करत असून अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची खबरदारी महाराष्ट्र शासनाने घ्यावी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा
देशाची राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवून हा देश महामानवांच्या विचारांवर चालणार नाही तर हुकूमशाही वर चालणारे शासनाने दाखवून दिले आहे याचीही नैतिक जबाबदारी स्वीकारून संसदेतील खासदार व आमदार (एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील) प्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत यावेळी विश्रामगृहापासून मोर्चाला सुरुवात झाली महापुरुषांच्या घोषणा बरोबर अक्षयच्या मारेकरांनाफाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला आणि जमलेल्या मोर्चातील लोकांनी तहसीलदार यांना निवेदन दिले