पुसद प्रतिनिधी-बाळासाहेब ढोले
पुसद-भारतीय समाज विज्ञाननिष्ठ करण्याकरिता बौद्धधम्माचा प्रचार आणि प्रचार होणे अत्यंत गरजेचे आहे, म्हणून पौर्णिमा धम्मसंगितीचे आयोजन चार्वाकवनात करण्यात येत आहे. सन २०११ च्या ज्येष्ठ पौर्णिमेला पहिली धम्मसंगिती भरली होती. त्याला आज एक तप, बारा वर्षे पूर्ण झाले आहेत,अशी माहिती चार्वाकवनाचे व्यवस्थापक अॕड. अप्पाराव मैन्द यांनी दिली आणि चार्वाकदर्शनावर चर्चा झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. टी. बी. कानिंदे होते. वंदनेनंतर पी. बी. भगत यांनी ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्व विशद केले आणि नंतर चर्चा झाली.
आभार संजय आसोले यांनी केले. यावेळी गोविंद तलवारे,यशकुमार भरणे, चंद्रकांत आठवले,अनिल डोंगर, प्रदीप तायडे आणि विश्वजीत भगत उपस्थित होते.
प्रा.टी.बी.कानिंदे यांनी नुकतीच श्रीलंकेला भेट दिली .त्यांना प्रवासात आलेले अनुभव त्यानी सांगितले तसेच उपस्थितांना अल्पोपहार दिला.