Home शैक्षणिक सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी चा उत्कृष्ठ निकाल

सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी चा उत्कृष्ठ निकाल

79

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपुरी(दि.3 जून):-
नुकताच एस.एस.सी. नागपूर बोर्डाचा निकाल घोषित झाला.यामध्ये आमच्या डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी,ब्रम्हपुरी द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी चां उत्कृष्ठ निकाल लागला. शाळेचा एकूण 88% निकाल लागला असून कू. विधांती महेश गणवीर हिने 87% गुण प्राप्त करत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. तर प्रतीक देवराव महाजन याने 82.80 गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच सुमित सुनील राखडे याने 81.80% गुण मिळवित तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच 7 विद्यार्थी हे प्रविण्याप्रप्त तर 21 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले असून उर्वरित विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे. निकाल घोषित झाल्या बरोबर संस्थेचे अध्यक्ष आद. डॉ. प्रेमलाल मेश्राम, आद. विवेक प्रे. मेश्राम सचिव, माजी प्राचार्य वाय.आर.मेश्राम कोषाध्यक्ष, प्रा. लिनाताई मेश्राम सदस्या, श्री बी. एम. नगराळे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी जाऊन गुणवत्ताधारक क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ तथा तोंड गोड करून पुढील वाढचाली करिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here