Home महाराष्ट्र पुसद येथे दहा दिवशीय बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

पुसद येथे दहा दिवशीय बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

103

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी
पुसद- शहरातील पारमिता बुध्दविहार महाविरनगर येथे दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा यवतमाळ अंतर्गत तालुका शाखा पुसद यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६७ व्या जयंतीनिमित्ताने दि.३ मे ते १२ मे २०२३पर्यंत दहा दिवशीय बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे उध्दाघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत कांबळे तालुकाध्यक्ष तथा माजी सैनिक,संगणायक भदंत सारिपुत्त सोलापूर,भदंत रठ्ठपाल सोलापुर,उध्दाटक म्हणून रवी भगत जिल्हाध्यक्ष, मार्गदर्शक म्हणून सुमंगल तथा रवींद्र अहिरे गुरुजी केंद्रीय शिक्षक जळगाव, तर प्रमुख पाहुणे म्हणून धम्मदीप पाईकराव तालुकाध्यक्ष उमरखेड, प्रकाश खंदारे तालुकाध्यक्ष महागाव, धम्मदीप पाईकराव केंद्रीय शिक्षक ,राजेश ढोले पत्रकार, कैलास श्रावणे पत्रकार, गोपाल लोणारे,कैलास कांबळे शहराध्यक्ष आर्णी, शांता मंडाले महावीरनगर महिला वार्ड शाखाध्यक्षा यांच्या उपस्थितीमध्ये तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

या बौद्धाचार्य श्रामनेर शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थींनी बौद्धाचार्य श्रामणेर म्हणून प्रवज्जा घेतली. यावेळी रवी भगत, सुमंगल तथा रवींद्र अहिरे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर संघास फल्हार दानकर्ते सुरेंद्र गावंडे यांनी सपत्नीक सहपरिवार येऊन दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान बरडे यांनी केले तर प्रास्ताविक भोलेनाथ कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय बौद्ध महासभा शहर व तालुका शाखा पुसदचे पदाधिकारी, सदस्य मंडळी हे अथक परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here