बाळासाहेब ढोले,विशेष प्रतिनिधी
पुसद- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या अंतर्गत तालुका शाखा पुसद यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६७ व्या जयंतीनिमित्त पारमिता बुद्धविहार महावीर नगर येथे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे दि.३ मे २०२३ते दि.१२ मे२०२३ पर्यंत आयोजन करण्यात आले.
या बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे अध्यक्ष म्हणून भारत कांबळे तालुकाध्यक्ष तथा माजी सैनिक, या शिबिराच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय शाखेकडून संघनायक म्हणून पूजनीय भन्ते सारिपुत्त सोलापूर, शिबिरासाठी केंद्रीय शिक्षक म्हणून रवींद्र तथा सुमंगल अहिरे गुरुजी जळगाव,तर प्रमुख अतिथी म्हणून रुपेश वानखडे हे उपस्थित राहणार आहेत. शिबिराचे उदघाटन दि ३ मे२०२३ सायंकाळी ठीक ४ वा होणार आहे.
या शिबिराचे उदघाटक म्हणून रवी भगत, जिल्हाध्यक्ष यवतमाळ हे उपस्थित आहेत.
दि. ५ मे २०२३ वैशाख पौर्णिमा बुध्द जयंतीनिमित्त श्रामणेर व समता सैनिक दल यांचे शांती मार्च चे आयोजन करण्यात आले आहे. हा मार्च पारमिता बुध्द विहारापासुन , वसंतराव नाईक चौक,महात्मा फुले चौक,तिन पुतळा चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,नेताजी सुभाषचंद्र बोस चौक,नगीना चौक, महात्मा गांधी चौक,डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत सायंकाळी ठिक ५ वाजता शांती मार्च काढण्यात येणार आहे.व दि.१२ मे २०२३ रोजी या शिबिराचा समारोपीय कार्यक्रम होईल. त्यानंतर भोजनादानाचा भव्य कार्यक्रम होईल.
यामध्ये बौध्दाचार्य श्रामनेर, समता सैनिक दल, उपासक -उपसिका तसेच पुरोगामी विचारांच्या मंडळीनी शुभ्र वस्त्र परिधान करुन सर्वांनी सहभागी व्हावे तसेच बौध्दाचार्य श्रामनेर शिबिराच्या यशस्वीतेसाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पुसद चे वतीने करण्यात आले आहे.