सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : जिल्हा परिषदेच्या म्हसवड शाळा नंबर एक मध्ये शिकत असलेल्या श्रीराम महेश वास्ते या विद्यार्थ्याने राज्य स्तरीय मंथन परीक्षेत १५० पैकी १३८ गुण मिळवून राज्यात सातवा क्रमांक मिळविल्याची माहिती मुख्यध्यापक राजेंद्र खाडे व वर्गशिक्षक योगेश्वरी स्वामी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की म्हसवड येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये श्रीराम वास्ते इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत असून मंथन वेलफेअर फौंडेशन यांनी घेतलेल्या २०२३ च्या परीक्षेत श्रीरामने घवघवीत यश मिळवले आहे. मंथन वेलफेअर फौंडेशन हे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी व भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी हे फौंडेशन सामान्य ज्ञान परीक्षा घेते. यामधून विद्यार्थ्यांच्या शोधक वृतीला व कल्पक वृतीला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो.
मंथन परीक्षेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ नुकताच अहमनगर येथें पार पडला या कार्यक्रमात श्रीराम वास्ते या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मंथन परीक्षेच्या माध्यमातून माण तालुका बुद्धीचा सुकाळ असल्याचे गौरउदगार सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी काढले.
या कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आशिष येरेकर, शिक्षण आयुक्त डॉ. पुरोषत्तम भापकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ निशिगंधा वाड , डॉ. वैभव अजमेरी, डॉ अशोक जोगदे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
श्रीराम वास्ते या विद्यार्थ्यांचे सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर,माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माणिकराव राऊत, विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे, सर्व केंद्र प्रमुख, शिक्षण प्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले आहे.