पंकज रामटेके, विशेष प्रतिनिधी
घुग्घुस -येथून जवळच असलेल्या उसगाव येथे रविवार, ३० एप्रिलला ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे लाभार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्राचे नि:शुल्क वितरण करण्यात आहे.
उसगाव येथील गोर गरिबांना शासकीय प्रमाणपत्र नि:शुल्क दिल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे उसगाव वासियांनी आभार व्यक्त केले तसेच ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचा स्तुत्य उपक्रम असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष सचिन कोंडावार, विनोद जंजर्ला, स्वप्नील इंगोले, अजय लेंडे व गावकरी उपस्थित होते.