गडचिरोली: दि.२८ एप्रिल २०२३: स्थानिक जिल्हा सत्यसाई संघटनेकडून येत्या मंगळवारी दि.२ मे २०२३ रोजी सत्यसाई सत्संगभवन, सर्वोदय वॉर्ड, गडचिरोली येथे स.९ ते १२ वा.पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी भगवान सत्यसाई बाबांच्या मातोश्री ईश्वरम्मा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात. त्यात ‘रक्तदान श्रेष्ठदान’ समजण्यात येणारा उपक्रम सुद्धा समाविष्ट असतो. त्याची पूर्तता म्हणून मंगळवार दि.२ मे २०२३ रोजी सत्यसाई सत्संगभवन, सर्वोदय वॉर्ड, गडचिरोली येथे स.९ ते १२ वा. यावेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, इच्छुक रक्तदात्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुद्धा सत्यसाई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे, की भगवान सत्यसाई बाबांच्या मातोश्री ईश्वरम्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडचिरोली जिल्हा सत्यसाई बाबा संघटनेकडून पाच दिवस समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात. याचाच भाग म्हणून २ मे २०२३ रोज मंगळवारला स.९ ते दु.१२ वा.पर्यंत संघटनेकडून रक्तदान शिबीराचे आयोजन सत्यसाई सत्संगकेंद्र,सर्वोदय वार्ड गडचिरोली येथे करण्यात आलेले आहे. आपणास विदितच आहे, की बऱ्याच रुग्णांच्या शरीरात रक्ताची कमतरता भासत असते. ती भरून काढण्यासाठी ‘रक्तदान श्रेष्ठदान’ असल्याने या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक दायित्व पार पाडावे. असे आवाहन सत्यसाई बाबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी ९४२३६४६७४३ या मोबा. क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सूचविण्यात येत आहे. जेणेकरून रक्तदानास कुठल्याही प्रकारची समस्या वा अडचण आड येणार नाही. ही महत्वाची माहिती कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी यांनी दिली आहे.