अशोक कांबळे, विशेष प्रतिनिधी,
बारामती (प्रतिनिधी) – संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्षेत्राच्या अंतर्गत बाबा हरदेवसिंह जी महाराज क्रिकेट टूर्नामेंट व विविध स्पर्धा 2023 आयोजित केल्या आहेत
या स्पर्धेत बारामती क्षेत्रातील चौदा संघ भाग घेणार असून सदर स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर शनिवार दिनांक 29 रविवार दिनांक 30 एप्रिलला सकाळी नऊ ते पाच या वेळेत होणार आहेत, तसेच या बरोबरच खो – खो, कब्बड्डी व अन्य स्पर्धाचे आयोजन केले असल्याचे बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांनी सांगितले.
संत निरंकारी मंडळ हे आध्यात्मिक मिशन असून या मिशनच्या माध्यमातून मानवी मनाला स्थिर करण्याचे महान कार्य करत आहे. त्याच अनुषंगाने शरीर देखील तंदुरुस्त रहावे हा उद्देश घेऊन हे मिशन क्रिकेटसह इतर स्पर्धेचे आयोजन करत असल्याचे श्री माने यांनी सांगितले.
तसेच या स्पर्धेचा सर्वांनी मनसोक्त आनंद घ्यावा असेही आवाहन श्री. माने यांनी केले केले आहे.