विशेष प्रतिनिधी / पंकज रामटेके
घुग्घुस येथील कॉ. नं.२ जवळील बहिरमबाबा देवस्थानाचे विविध विकास कामे करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलिकडे पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने वेकोलितर्फे बहिरमबाबा देवस्थान परिसरात विविध विकास कामे करण्यात येणार आहे.
एक शेडचे सभागृह, एक सार्वजनिक शौचालय, एक पिण्याच्या पाण्याची आरो मशीन, वेकोलि रस्ता ते मुख्य गेट पर्यंतचा रस्ता, परिसराचे सौंदर्यीकरण व वृक्षारोपण याठिकाणी करण्यात येणार.
आधी हे देवस्थान ओसाड पडले होते. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून सुंदर बगीचा बनविण्यात आला, शेड बनविण्यात आले, पाण्याची व्यवस्था करण्यात आली, विजेचे दिवे लावण्यात आले होते.
वरील विविध विकास कामे करण्यासाठी देवस्थान कमेटीचे शाम आगदारी यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना निवेदन दिले होते.
विविध विकास कामे मंजूर केल्याबद्दल बहिरमबाबा देवस्थानच्या सर्व भाविक भक्तांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला