Home महाराष्ट्र आमदारांनी टोचले प्रशासनाचे कान अन ‘त्या’ पिकांचे पंचनामे झाले सुरू

आमदारांनी टोचले प्रशासनाचे कान अन ‘त्या’ पिकांचे पंचनामे झाले सुरू

171

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी) :-
पूर्णा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे आलेगाव, कळगाव, चुडवा, पिंपरण, धनगर टाकळी, धानोरा मोत्या, पिंपळा भात्या, मिठापुर व सारंगी या गावातील कापूस, ऊस, उन्हाळी सोयाबीन, फळबागांचे व घरांची पडझड होवून अतोनात नुकसान झाले होते.
त्यामुळे गंगाखेड विधानसभेचे संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी ‘त्या’ नुकसानग्रस्त (क्षतीग्रस्त) पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि पूर्णा तहसीलदार यांच्याकडे केली होती. परिणामी, प्रशासनाने हालचाल करून अखेर पंचनामे सुरू केले आहेत. त्यामुळे शासन स्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, अतिशय तत्परतेने आ.डॉ.गुट्टे यांनी सूत्रे हलवून‌ प्रशासनाचे कान टोचल्याने पंचनामे सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here