Home चंद्रपूर ब्रम्हपुरीतील सिनेमागृहाला आग लागून साहित्य जळाल्याने लाखोंचे आर्थिक नुकसान

ब्रम्हपुरीतील सिनेमागृहाला आग लागून साहित्य जळाल्याने लाखोंचे आर्थिक नुकसान

113

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपुरी(21 एप्रिल):- तालुक्यातील स्थानिक अलंकार सिनेमागृहाला आग लागून तेथील साहित्याची राख झाली आहे. आगीत सिनेमागृह मधील सर्व साहित्य जळाल्याने लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील एकमेव अलंकार सिनेमागृह आरमोरी मार्गावर आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिनेमा गृहाला आग लागून संपूर्ण सिनेमागृहातील साहित्य जळून खाक झाले. समोरील लोखंडी दार कुलूप लावून बंद करण्यात आले होते. आत जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. सकाळी दहा वाजताच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांनी दार उघडून आत प्रवेश केला असता सदर प्रकार निदर्शनात आले.
मशीन, पडदा, पडद्यामागील साऊंड, इलेक्ट्रिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याने मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरी पोलिसांकडून घटनास्थळची दखल घेण्यात आली आहे. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली हे अजून कळली नाही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here