बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी
पुसद -तालुक्यातील कारला (देव )येथे वंचित बहुजन आघाडी शाखा फलक अनावरण तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव व तालुका उपाध्यक्ष कृष्णा दोडके यांच्या हस्ते करण्यात आली.
कार्यक्रमाला उपस्थित तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव ,तालुका उपाध्यक्ष कृष्णा दोडके ,भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, वंचित शहर अध्यक्ष जयानंद उबाळे, भास्कर बनसोडे व कारला (देव)येथील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.शाखा अध्यक्ष म्हणून अजय टाळीकोटे यांची निवड करण्यात आली.
कारला (देव)या गावचे वैशिष्ट्य हे की येथे एकही बौद्ध समाजाचे घर नसून सुद्धा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या वर्षी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. *”वंचित सारे ऐक होऊ सत्ता आपल्या हाती घेऊ”*
या वंचितच्या ब्रीदवाक्य नुसार
वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे कार्य शहरी तथा ग्रामीण भागात
मोठ्या जोमाने सुरू आहे.