Home बीड ठाकरवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ठाकरवाडी-पांचाळेश्वर ही ग्रुप ग्रामपंचायत असून...

ठाकरवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ठाकरवाडी-पांचाळेश्वर ही ग्रुप ग्रामपंचायत असून स्वातंत्र करून देणार – अमरसिंह पंडित

261

 

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114

गेवराई तालुक्यातील ठाकरवाडी तांडा येथील ग्रामपंचायत सदस्यसह शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करून. सोबतच अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं आहे. ठाकरवाडी-पांचाळेश्वर ही ग्रुप ग्रामपंचायत असून ती ठाकरवाडीकरांना स्वतंत्र करून देणार तसेच गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहून विकासकामे जोराने करु, यात आपण सर्वांनी एकत्र आला आहात असेच एकजुटीने काम करा आपल्या तांड्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार आपल्याला काहीही कमी पडणार नाही असल्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी‌ काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी बोलताना सांगितले आहे.
अमरसिंह पंडित आणि जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य एकनाथ राठोड व बाबासाहेब राठोड तसेच राजू चव्हाण, विकास चव्हाण, बंटी चव्हाण, काळू चव्हाण, अशोक चव्हाण, राजू चव्हाण, विलास जाधव, आकाश जाधव, ज्ञानेश्वर पवार, परमेश्वर पवार, अंकुश जाधव, अंकुश राठोड, संजय चव्हाण, गोरख चव्हाण, प्रवीण सुंदर चव्हाण, परशुराम चव्हाण, पापा उर्फ पप्पू चव्हाण, नवनाथ पवार, परमेश्वर चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी डिगांबर आडे, गणेश फरताडे, नितीन संत, शैलेश संत, शिवाजी आडे हे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here