पंकज रामटेके /विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर – सकारात्मक पत्रकारीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यात जिल्हा कार्याध्यक्ष पदावर राजू बिटटूरवार तर उपाध्यक्ष संजय कन्नावार, कोषाध्यक्ष अनूप यादव यांचा समावेश आहे.
राजू बिट्टूरवार हे मागील अनेक वर्षांपासून पत्रकारितेत असून विदर्भ आठवडी नावाचे साप्ताहिक वर्तमानपत्र ते प्रकाशित करित असतात, त्याच सोबत त्याच नावाचे त्यांचे न्यूज पोर्टल ही आहे. आपल्या वेगळ्या व अभ्यासू लिखाणामुळे त्यांना पत्रकारितेत ओळखले जाते. त्यांचे विविध विषयांवरचे विशेषांक वाचनिय व संग्रहनीय राहिले आहे.
व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे अनुमतीने ही कार्यकारीणी डिजीटल विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी जाहीर केली आहे. जाहीर करण्यात आलेली कार्यकारीणी मध्ये कार्याध्यक्ष – राजू बिटटूरवार (विदर्भ आठवडी), उपाध्यक्ष – संजय कन्नावार (चंद्रपूर क्रांती), मनोज पोतराजे (महाराष्ट्र ३४) कोषाध्यक्ष – अनूप यादव (संपादक-ग्लोबल महाराष्ट्र) कार्यवाह- मनिष रक्षमवार (खबर महाराष्ट्राची), संघटक- अरूण वासलवार (अरूणोदय), सहसंघटक – संतोष येनगंदलवार (सीबीएन न्यूज) सरचिटनिस- भैरव दिवसे (आधार न्यूज नेटवर्क) सहचिटनिस – अशोक येरमे (मूल टूडे), जनसंपर्क प्रमुख (प्रसिध्दी प्रमुख)- सुलेमान बेग (वन समाचार), कार्यकारणी सदस्य श्रीहरी सातपुते (पुरोगामी संदेश व सी टिव्ही), रंजिता नायडू (पब्लिक अॅप), कुमूदिनी भोयर (पब्लिक मीडिया)
जिल्हा कार्यकारीणीसह तालुका अध्यक्ष यांची निवड करण्यात आली असून, तालुकानिहाय अध्यक्ष पुढीलप्रमाणे
चंद्रपूर तालुका अध्यक्ष – हिमायू अली (आरटीआय न्यूज), बल्हारपूर तालुका अध्यक्ष – शंकर महाकाली (सुवर्ण भारत), राजूरा तालुका अध्यक्ष – दिपक शर्मा (आमचा विदर्भ), मूल तालुका अध्यक्ष – अमीत राऊत (मूल लाईव), कोरपणा तालुका अध्यक्ष – मुमताज अली (कोरपना लाईव), सावली तालुका अध्यक्ष – राकेश गोलपेल्लीवार (जनसेवा न्यूज), ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष – विनोद चौधरी (ब्रम्हवार्ता), नागभीड तालुका अध्यक्ष – यश कायरकर (पब्लिक पंचनामा), सिंदेवाही तालुका अध्यक्ष – मिथून मेश्राम (पब्लिक समाचार), चिमूर तालुका अध्यक्ष – विलास मोहीनकर (पब्लिक पंचनामा), भद्रावती तालुका अध्यक्ष – अतुल कोल्हे (चांदा ब्लास्ट), वरोरा तालुका अध्यक्ष – आलेख रट्टे (पब्लिक पंचनामा), पोंभूर्णा तालुका अध्यक्ष – आशिष नैताम (लोकहित महाराष्ट्र), जिवती तालुका अध्यक्ष – शब्बीरभाई (लोकशाही भारत) गोंडपिपरी तालुका अध्यक्ष युवराज फलके (स्वराज्याचा अरूणोदय) आदींचा समावेश आहे.