अनिल साळवे (विशेष प्रतिनिधी)
गंगाखेड (प्रतिनिधी)-परभणी येथील हॉटेल राधिका पॅलेस या ठिकाणी माहेश्वरी सभेच्या नूतन कार्यकारिणीची वर्ष 2023-26 साठी निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी गोपाळ मंत्री यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश सह निवडणूक अधिकारी संजय मंत्री, जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी विजयप्रकाश मनियार व पन्नालाल मुरक्या यांनी दिले. वर्ष 2019 -22 दरम्यान गोपाळ मंत्री यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली होती व त्यांच्या कार्याची दखल घेत परत 2023 -26 या तीन वर्षासाठी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल संपूर्ण मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. गंगाखेड तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष विजयकुमार बंग तथा संपूर्ण पदाधिकारी, सभेचे माजी अध्यक्ष नंदकिशोर सोमानी, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम धूत, प्रदेश सभेचे सदस्य ॲड. अशोकभाऊ सोनी, डॉ. विवेक नावंदर,ब्रिजगोपाल तोष्णीवाल, महेश बँक शाखा गंगाखेड ,सरस्वती विद्यालय परिवार , लायन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी परिवार, प्रवासी महासंघ, ग्राहक मंच, भाजपा शिक्षक आघाडी, पतंजली परिवार, सवंगडी कट्टा समूह, पत्रकार संघ या सर्वांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.