Home चंद्रपूर किन्ही येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या वर कारवाई करा – महिलांची पोलीस...

किन्ही येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या वर कारवाई करा – महिलांची पोलीस अधीक्षकाकडे मागणी कीन्ही गावात सर्व पक्षीय राजकारणाला उबगलेल्या गावात एकत्र येत ग्रामपंचायत अविरोध निवडणूक केली

106

 

ब्रम्हपुरी(दि.13 एप्रिल):- तालुक्यातील कीन्ही गांव ब्रम्हपुरी-आरमोरी राज्य मार्गावर आहे. गावा मध्ये सर्व महिला शक्ती एक होऊन गावात ग्रामपंचाय तिची निवडणूक होऊ न देता अविरोध ग्रामपंचायतची निवडणूक सरपंच व उपसरपंच व पदाधिक यांचे निवडणूक झाली आहे. सर्व महिला मिळून गावातील हे काम करीत आहेत .गावातील अवैध दारूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. गावात दारूबंदी होण्यासाठी दोन-तीन महिन्यापासून मोहीम राबविली आहे. गावातील जलीदर भर्रे व महेश वैरकार या दारू विक्रेत्यांची दारू पकडून दिली असता पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र गावात येऊन महिलांना शिवीगाळ करून जीवी मारण्याची धमकी दिली आहे. गावातील महिलावर अन्य प्रकार घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न गावात निर्माण झाला आहे. किन्ही गावामध्ये पुन्हा दारू विक्री सुरू झाली आहे .गावात शेखर रामाची कुत्तरमारे ,गणेश बक्षी सोनवणे, मंगेश किशन पोहनकर हे सर्व दारू विक्री करीत आहेत. हे तिन्ही दारू विक्री करणारे गावात दहशत माजवीत आहेत गावातील शांतता व सुव्यवस्था विस्कळीत करीत आहेत .लहान मुले व माणसे दारूच्या आहारी गेल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .गावात तंटे-दंगे होणे व भांडण सुरू झाले आहे .त्यांच्यावर योग्य कारवाई करावी याकरिता पोलीस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक ब्रह्मपुरी यांना निवेदन दिले आहे. येत्या सात दिवसांमध्ये गावातील दारूबंदी न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येणार म्हणून अशी गावातील महिलांनी इशारा दिला आहे.निवेदन देताना गावातील सारिका मारुती वैरकार, मनोरथा मन्साराम बुल्ले, प्रमिला रामचंद्र वैरकार, रसिका युवराज सोनवाणे ,सरिता मोरेश्वर वैरकार, सुनिता देवीदास प्रधान, शिल्पा ओमप्रकाश प्रधान, मंगला महादेव नक्षीने, योगिता पुरुषोत्तम प्रधान, रीना रवी सहारे, उज्वला उत्तरपाल प्रधान, देविका दिलीप बगमारे, अनिता अभिमान गडे ,माया रामकृष्ण बगमारे ,कुंदा भगवान प्रधान ,रेखा सोनवणे व अन्य गावातील महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here