पुसद प्रतिनिधी(स्वप्निल गोरे)
पुसद(दि.1मार्च):-स्थानिक प्रतिनिधी जनता शिक्षण प्रसारक मंडळ, पुसद द्वारा संचालित फुलसिंग नाईक महा. पुसद च्या विद्यार्थी प्रेरित साहित्य चळवळीच्या अग्रस्थानि असलेल्या “कल्यना वार्षिकांकास” विद्यापीठाच्या पाच जिल्ह्यातून शहरी विभागातून तृतिय पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसे तर गेली चार वर्षे कल्पना वार्षिकांक पहिल्या तीन मध्येच आहे. सत्र 2018-19 ला तृतिय, सत्र 2019-20 ला प्रथम, सत्र 2020-21 द्वितीय ग्रामीन मधून व सत्र 2021-22 ला शहरी भागातून तृतिय पुरस्कार अत्यंत चूरशीच्या लढतीत पुरस्कार प्राप्त झाला ही फुलसिंग नाईक महाविद्यालयासाठी महत्वाची बाब आहे.सर्व सहभागी विद्यार्थी अत्यंत मेहनतीने या अॅक्टीव्हीटीमधे सहभागी होत असतात. तसेच विद्यार्थांच्या साहित्य अभिरूचिला चालना देणारा हा उपक्रम असतो.
आमचे प्राचार्य डाॅ. अरून पाटील व सर्व सहकारी यासाठी आम्हाला मदत करीत असतात म्हणूनच हे यश आमच्या पदरात पडले आहे. यावर्षीची कल्पना वार्षिकांकाची संपादन समिती प्राचार्य डाॅ. ए. बी. पाटील, डाॅ. प्रल्हाद वावरे, डाॅ. भास्कर पाढेण, डाॅ. गोपाल शेळकीकर, डाॅ. संजय भोयर, डाॅ. आनंद वडवले, प्रा. जितेंद्र नेहते, प्रा. अंजली पाम्पपट्टीवार, डाॅ. नूरखान या सर्वांचे खूप सहकार्य लाभले. या यशासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. जयभाऊ नाईकसाहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले असून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे