✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपूरी:(दि. 31 मार्च):-दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री. अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज यांचा उत्सव, प्रभू श्री.रामचंद्राच्या रामनवमीच्या शुभ पर्वावर श्री. साईबाबा मंदिर बरडकिन्ही येथे उत्साहात आणि अपार आनंदात संपन्न झाला.
दिनांक 30 मार्च रोज गुरुवारला गोपालकाल्याचा कार्यक्रमानिमित्त सुमधुर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये साईबाबा भजन मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहून कर्णमधुर भजन गायनाचा कार्यक्रम सादर केला. यामध्ये हार्मोनियम वादक संजय प्रधान, तबलावादक सुनील माकडे, तबलावादक राहुल ठाकरे, गायक प्रकाश तुपट, नंदकिशोर दोनाडकर महाजन, प्रकाश नखाते, युवराज राऊत सचिन धोटे तर गायिका रंजना राऊत, वनिता तुपट, सविता दोनाडकर या होत्या.यांनी सुमधुर आणि कर्णमधुर मंगलमय भजन गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
दरवर्षीप्रमाणे “दहीहंडी” फोडण्याचा कार्यक्रम आदरणीय श्री. सदाशिवजी दोनाडकर महाजन से. नि.शिक्षक यांचे हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे अ श्रेणी बिडीओ रवींद्रजी घुबडे साहेब,अभियंता मदनजी खापणे साहेब, ठेकेदार द्यानेश्वर पा. दिवटे, विनायक ऊर्फ विनुभाऊ मोटवानी, सुभाष भाऊ मोटवानी, यांनी उपस्थिती दर्शविली.
या कार्यक्रमानंतर लगेचच महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गावातील जनतेने महाप्रसादाचा लाभ घेतला.स्वादिष्ट भोजन रामदास राऊत,तुळशीदास ठाकरे, विनायक उरकुडे,माधव भोयर यांनी बनविले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.साईबाबा मंदिराचे अध्यक्ष तथा परम साईभक्त विजय हुड, घटस्थापना करणारे नवनाथ दोनाडकर, वामन दोनाडकर, रामलाल महादेव दोनाडकर यांचेसह सर्व साईबाबा मंदिराचे सर्व कार्यकारी पदाधिकारी तसेच श्री साईबाबा भजन मंडळाचे सर्व सदस्य, आणि गावातील सर्व साई भक्तांनी परिश्रम घेतले.