Home महाराष्ट्र कवियञी सौ सुलभा चव्हाण लिखित “मनोमनी “काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

कवियञी सौ सुलभा चव्हाण लिखित “मनोमनी “काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

137

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.30मार्च):- नक्षञाचं देणं काव्यमंच, शाखा मुंबई विभागाच्यावतीने काव्यमैफल व सौ. सुलभा चव्हाण लिखित “मनोमनी” काव्यसंग्रहाचे साईराजे पब्लिकेशन, पुणे प्रकाशित प्रकाशन अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

कविवर्या सौ सुलभा चव्हाण लिखित ‘मनोमनी या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा जाॅगिंग हाॅल, गोरेगाव ,मुंबई येथे मोठ्या दिमाखात पार पडला. समारंभाचे अध्यक्षपद प्रा.राजेंद्र सोनवणे (कवी, वादळकार) संस्थापक- अध्यक्ष- नक्षत्रा़चं देणं काव्यमंच” यांनी भूषवले. मा.डॉ.अलका नाईक (शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, लेखिका,) या समारंभाच्या उदघाटककपदी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.वामन नाखले (विभागीय संचालक मुंबई, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) हे उपस्थित होते.

तसेच गोरेगाव विधानसभा आमदार व माजी राज्यमंत्री मा.सौ.विद्या ठाकूर यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती. श्री. सतिश सिन्नरकर (संपादक, महानगरी वार्ताहर), सौ.अलका वठारकर ( महापौर पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापिका), पंडित वीरेन सामंत (संगीततज्ञ), सौ.ज्योती कुलकर्णी (कवयित्री,समाजसेविका),सौ.वीणा सामंत(संस्कार भारती- मुंबई, सह-विभाग प्रमुख) हे शुभेच्छुक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन आणि सुरेखा गावंडे याच्या सुरेल गणेशस्तवनाने समारंभाची प्रसन्न सुरूवात झाली. त्यानंतर सर्व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले.

सर्व पाहुण्यांनी *मनोमनी* काव्यसंग्रहातील विविध रचनांची दखल घेत सौ. सुलभा चव्हाण यांचे खूप कौतुक केले. “नक्षत्राचं देणं काव्यमंच”चे राष्टीयअध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी आपल्या खुसखुशीत भाषणात म्हणाले,”कवींच्या कथा-व्यथा मांडल्या, खास कवींसाठी सन्मानाचे,आदराचे व्यासपीठ मिळणे किती गरजेचे आहे. त्यासाठी नक्षत्रांचं देणं काव्यमंचकडून सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाहीसुद्धा दिली. कवींनी वाचन करणे आणि इतरांच्या कविंतांना रसिकेतेने ऐकणे आवश्यक आहे. विविध छंदाचा अभ्यास करावा.”

उदघाटक कवयित्री, समाजसेविका मा.डॉ.अलका नाईक (अध्यक्षा उत्तर मुंबई नक्षत्राचं देणं काव्यमंच) यांनी मनोमनी काव्यसंग्रहातील काव्यरचनांवर भाष्य करता करताच अवयव दानाचेही महत्त्व श्रोत्यांना समजावून दिले. मा.डॉ.वामन नाखले यांनी जाणकार शब्दात साहित्यावर आपले विचार मांडले. मा.आमदार सौ.विद्या ठाकूर यांनी भरभरून शुभेच्छा देत अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी सदैव मदतीचे आश्वासन दिले.त्यानंतर निमंत्रित कवींचे बहारदार काव्यमैफल झाली. डॉ. अलका नाईक, सौ.अलका वठारकर, सौ‌.ज्योती कुलकर्णी,सौ.वीणा सामंत, श्री.शेखर चमनकर, सौ.रुपाली चेऊलकर, सौ.नेहा आठवले, श्री.मनोहर वठारकर यांनी *स्वरचित कवितांबरोबरच *मनोमनी*मधील कवितांचेही सादरीकरण केले.*

तसेच कवयित्री सौ. पूजा काळे, सौ. श्रद्धा पाटील यांनीही आपल्या स्वरचित काव्यरचना सादर केल्या. त्याबरोबरच *मनोमनी* काव्यसंग्रहातील पंडित विरेन सामंत यांनी संगीतबद्ध केलेली एक रचना सौ.सपना आपटे यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.सौ.सुलभा चव्हाण यांनी आपल्या मनोगतात*मनोमनी*ची वाटचाल विषद करत निवडक रचनांचे सादरीकरण केले व त्यासाठी पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.सौ.प्रतिमा भगत यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.सर्व आमंत्रित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.सर्व उपस्थितांना नक्षत्राचं देणं काव्यमंच तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजक श्री.सुभाष चव्हाण यांनी सर्व अतिथी व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. चहापानानंतर कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्या़च्या हस्ते तुळशीच्या रोपाला अभिसिंचन केले गेले व सर्व उपस्थितांनी म्हटलेल्या विश्वगीत पसायदानाने अत्यंत प्रसन्न वातावरणात या प्रकाशन समारंभाचा समारोप झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here