✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)
नांदेड₹दि.२८मार्च):-रॉयल फिटनेस अँड वेलनेस सेंटर उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे हस्ते आज बजाज गॅलेक्सी नांदेड येथे झाले आहे.
उद्घाटन प्रसंगी श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले की ,प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, जगामध्ये जे लोक यशस्वी झालेले आहेत ते सर्वजण स्वतःच्या शरीरासाठी एक तास वेळ देऊन व्यायाम करतात. योग्य आहार आणि व्यायाम जर केला तर मनुष्य निरोगी राहतो. आपल्या देशामध्ये सध्या फिट फॉर इंडिया मोमेंट चालू आहे ,त्याच धर्तीवर आता आपण नांदेडमध्ये फिट फॉर नांदेड ही मुव्हमेंट राबवूया असे मी नांदेडकरांना आवाहन करतोय.
रॉयल फिटनेस वेलनेस सेंटरचे पांडुरंग शिंदे आणि सचिन थोटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबडे , बालाजी सूर्यवंशी तळणीकर, प्रा. पांडूव मुंगनाळे, विठ्ठल शिंदे,शिवाजी गायकवाड, अतुल येवतीकर, तुकाराम सूर्यवंशी,सुमती व्याहाळकर, निशिता शिंदे, नेहा वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.