✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.28मार्च):-ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे) महाराष्ट्र राज्याचे संघटक सचिव प्रा. शहाजी कांबळे यांना या वर्षीचा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा समता जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रा. शहाजी कांबळे गेली 30/35 वर्षे विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात. आरक्षणासाठीचा लढा, दलित अत्याचार विरोधी संघर्ष, एक गाव एक पानवटा, मराठवाडा नामांतर लढा, जातीअंताचा लढा अशा अनेक आंदोलनात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या कृतिशील कार्याची दखल घेऊन समता जीवन गौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त… निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आणि संविधान जनजागृती अभियान यांच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी होत असलेल्या आठ दिवसाच्या कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक चळवळींना गतिमान करण्यासाठी प्रबोधनाची भूमिका पार पडणाऱ्या समता महोत्सवात 9 एप्रिल रोजी दुपारी 1:00 वा. सिने अभिनेते किरण माने यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण दिला जाणार असून सदर पुरस्कार वितरण समारंभास माजी आमदार राजीव आवळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजया कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. श्रीकृष्ण अडसूळ, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. अरुण गाडे, लेखिका व प्रकाशिका डॉ. शोभा चाळके उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार वितरण समारंभाला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अनिल म्हमाने यांनी केले आहे.