✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.28मार्च):-गेल्या काही महिन्यांपासून कळीचा मुद्दा ठरलेली मुंबई – बेंगलोर ग्रीन कॉरिडॉरअंतर्गत पाच हजार हेक्टर क्षेत्रावर होणारी ग्रीन कॉरिडोर अखेर म्हसवड परिसरातच होण्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले.परंतु आज याच कॉरिडॉर च्या विरोधात मासाळवाडी धुलदेव परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जनआक्रोश मोर्चा काढत प्रांताधिकारी यांना निवेदन दिले यावेळी शेतकऱ्यांनी कॉरीडॉर विरोधात आपल्या तीव्र भावना प्रांताधिकारी यांच्या पुढे मांडल्या.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष डॉ वसंत मासाळ. म्हणाले शेतकऱ्यांची घेणार कुठली जिरायत कि बागायत अशी कोणतीही पूर्व सूचना अथवा माहिती न देता जमीन अधिग्रहण करण्याचा घाट घातला जातं आहे शेतकऱ्यांना भूमिहीन आणि दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जातं आहे यामध्ये बहुजन समाजातील गरीब शेतकऱ्याच्या जमिनी लाटण्याचे काम एम आय डि सी च्या अधिकार्याकडून केले जातं आहे आमच्या बागायती जमिनी घेण्याचा प्रयत्न केला गेला तर यावेळी शेवटचा पर्याय वापरण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही.
स्थानिक शेतकरी आणि शिवसेना माण तालुका पदाधिकारी संतोष शेटे संतप्त प्रतिक्रिया देताना म्हणाले कोणत्याही परिस्थितीत एम आय डी सी ही होऊ देणार नाही तलाठी यांनी रविवार असताना सुद्धा फेरफार टाकला गेला जमीन अधिग्रहण करताना किमान स्थानिक शेतकरी यांना विश्वासात घ्यायला हवे होते त्याच्याशी चर्चा करायला हवी होती लाखो रुपये खर्च करून पडीक जमिनी पिकाऊ तयार केल्या आहेत विहीर पाईप लाईन करून वीस किलोमीटर राजेवाडी तलावातून माती आणून जमिनी सुपीक बनविल्या आहेत काही शेतकऱ्याच्या बागा आहेत तर काहीच्या शेत तळी आहेत लाखो रुपये खर्चून हजारो फुटावरून पाईपलाईन केल्या आहेत तालुक्यातील आणि जिल्यातील प्रतिनिधी यांनी पाणी देतो म्हणून आज वर अनेक वर्षे आम्हाला शेतकऱ्यांना खेळवले आहे आणी आज पाणी यायची वेळ आली असताना आम्हाला एम आय डि सी चे गाजर दाखविले जातं आहे आज वर्षानुवर्षे काबाड कष्ट करून आपल्या जमिनी पिकाऊ केल्या आहेत त्यातील एक गुंठा भर जमीनसुद्धा एम आय डी सी ला देणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले उपोषण आंदोलने करावी लागली किंवा आत्म दहन आत्महत्या करायची वेळ आली तरी मागे हटणार नाही.
डॉ सुरेश मासाळ म्हणाले धनगर समाजातील मेंढपाळ विस्थापित झाली तर शेतकऱ्यांनी मेंढरं चारायची कुठं यांचं मीठ षडयंत्र चालू आहे या इथं दुसरा मुळशी पॅटर्न चालू आहे आम्हाला हा मुळशी पॅटर्न किंवा एम आय डी सी ही नकोच आहे आम्हाला आमच्या हक्काची शेतीच हवी आहे.प्रातकार्यालयाबाहेर शेतकरी आक्रमक झालेला पाहिला मिळाला शासनाच्या विरोधात निदर्शने केली निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या शासणाची कोणतीच दादागिरी खपवून घेणार नाही जगाचा पोशिंदा जगलाच पाहिजे त्याला भूमिहीन केले तर येणार्या काळात लोकप्रतिनिधीना धडा शिकवल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही.यावेळी संतोष शेटे, मनोज सरतापे, रमेश सरतापे, संदीप लोंढे,राजू सरतापे,प्रभाकर लांब, बाळासाहेब मासाळ, रामभाऊ कोडलकर, वैभव शेटे, देविदास मासाळ, बाळू सरतापे व शेकडो शेतकरी सहभागी होते