(दोन दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर संपन्न)
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.27मार्च):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या अंतर्गत संरक्षण विभाग उमरखेड यांचे वतीने महाड क्रांती दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 25 मार्च ते 26 मार्च 2023 या दोन दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम दिनांक 26 मार्च रोजी करण्यात आला.
समता सैनिक दलाच्या सैनिकांनी शहरांमधून पतसंंचालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर समता सैनिक दलांच्या प्रशिक्षणार्थीचा पेपर घेण्यात आला. त्यानंतर शिबिराचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धम्मदीप काळबांडे तालुकाध्यक्ष हे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी रुपेश वानखेडे जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ तसेच प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षक मेजर गणेश दंदी अकोला तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून राजेसाहेब पंडित मेजर, मिलिंद बरडे मेजर, बाळासाहेब सावतकर,यशवंत काळबांडे, दिगंबर श्रवले,भास्कर कांबळे, धम्मदीप पाईकराव, गंगाधर कांबळे, पंजाब बरडे, शाहिर हटकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये 110महिला व पुरुष प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला होता. यशवंत कदम, प्रीती बरडे, ढोले , सिंधुताई पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
केंद्रीय शिक्षक मेजर गणेश दंदी यांनी शिबिरार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच मेजर राजेसाहेब पंडित व मेजर मिलिंद बरडे,यशवंत काळबांडे, रुपेश वानखेडे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन दामोदर यांनी केले तर आभार बाळासाहेब सावतकर यांनी मानले. सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.