🔸तहसीलदार अरविंद हिंगे यांनी मुरूम चोर रंगनाथ शंकरलाल धुत यांची केली पाठराखण
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
भंडारा (दि.27 मार्च):- भंडारा जिल्ह्यातील ग्राम बेला येथील गट क्रमांक 292/2, मध्ये (जागांवर/प्लाट) मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम साठा जमा करण्यात आले आहे. बेला ते भंडारा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला गट क्रमांक 292/2, येथे प्लाटवर 1500 हजारो ब्रास मुरूम साठ्णात आले आहे ते मुरूम बेकायदेशीरपणे उत्खनन करुन पाडण्यात आले आहेत. सदर बेला मंडळ अधिकारी एम.डी.वैध हे मुरूम चोरीला आळा बसण्याऐवजी मुरूम चोरीला उत्खनन व्यावसायाला गती देत असल्याचे दिसून येत असल्याने याला पाठबळ भंडारा येथील भ्रष्ट तहसीलदार अरविंद हिंगे देत आहेत.
सदर जमीनीवर गट क्रमांक 292/2 चे माल रंगनाथ शंकरलाल धुत यांनी सदर मुरूम रॉयल्टी काढून जास्त ब्रास मुरूम काढणे किंवा शेकडो ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्या जात आहे. प्रशासनाने रॉयल्टी धारकांनी दिलेल्या नियोजित जागेवर जाऊन परवानगी आणि प्रत्येक्ष केलेले उत्खनन याची चौकशी करुन कारवाई करण्यात यावे . याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले होते.
परंतु भ्रष्ट तहसीलदार अरविंद हिंगे यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता उपोषणकर्ता यांना पत्र दिले कि मा. उपजिल्हाधिकारी यांनी मुरूम काढण्याची परवानगी दिली असल्याचे आपल्या पत्रातून सांगितले, परंतु सदर पत्रानुसार 500 ब्रास ची परवानगी देण्यात आली आहे.आणि 1500 हजारोंच्या ब्रासमध्ये सदर जमीनीवर अवैध मुरूम पाढण्यात आले आहे. तरीपण भ्रष्ट तहसीलदार अरविंद हिंगे हे शासनाचे करोडो रुपयांचे महसूल बूडवत असुन सदर धुत याचा सकारत्मक बचाव करत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी आपले उपोषण 28/3/2023 रोजी,थेट मुंबई मंत्रालय समोर घेऊन जात आहेत.
सदर उपोषणाला 12 दिवस होऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे दिनांक 28 मार्च 2023 रोजी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रमुख सुरेश निंबार्ते उपोषणकर्ते मुंबई मंत्रालय समोर करणार आत्मदहन, यांची संपूर्ण जबाबदारी भंडारा येथील भ्रष्ट तहसीलदार अरविंद हिंगे याची राहील. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रमुख सुरेश निंबार्ते यांनी निवेदनात म्हटले आहे.