✒️इसलामपूर प्रतिनिधी(इकबाल पीरज़ादे)
इस्लामपूर(दि.27मार्च):-कासेगाव शिक्षण संस्थेच्या वाटेगाव हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या हिंदी विभागाच्या प्राध्यापिका सौ.मनीषा पाटील यांना सांगलीच्या आदर्श फाउंडेशन च्या वतीने देन्यात येणाऱ्या राष्ट्रीय आदर्श महिला शिक्षणरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फाऊंडेशन चे वतीने समाजातील शैक्षणिक व सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे महिलांच्यासाठी आदर्श फाउंडेशन हे पुरस्कार देत असते यावर्षी सौ मनीषा पाटील- कणसे त्यांना हा दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मनीषा पाटील-कणसे या बावची गावच्या सामाजिक क्षेत्रात व वाळवा तालुका महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श आदर्श गृहिणी आदर्श महिला व्यवसायीक, शैक्षणिक ,क्रीडा, वैद्यकीय, कला ,साहित्य, कृषी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 33 महिलांचा ट्रॉफी सन्मानपत्र शाल आणि कोल्हापुरी फेटा देऊन हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री खंडेराव ठोंबरेसर डॉ.सौ लताताई देशपांडे वुइमेन एज्युकेशन सोसायटी, ज्येष्ठ शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या सौ.विजयमाला खरात महिला बाल विकास अधिकारी सांगली .यांच्या उपस्थितीत माळी गार्डन हॉल सांगली येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
शिक्षण क्षेत्रातील आपली जवाबदारी सांभाळून महिलांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विशेष कामगिरी करण्याच्या भूमिकेतून वाळवा तालुक्यातील बावची गावातून या रणरागिणी ने आपल्या सामाजिक कार्याची सुरवात केली. त्याचे फलित म्हणून जागतिक महिला दिनी त्यांचा हा सन्मान झालेला आहे.कासेगाव शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये महाविद्यालयातून व बावची परिसरातून त्यांचे या पुरस्काराबद्दल कौतुक होत आहे आष्टा येथील आर्ट्स काॅमर्स महाविद्यालयाचे वतीने प्राचार्य तथा कासेगाव शिक्षण संस्थेचे सहसचिव कुरळपकरसर व महिलाराष्ट्रवादी सांगली जिल्हाध्यक्षा सौ सुष्मिता जाधव व वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्षा सुस्मिता देशमाने यानी ही हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ पाटील- कणसे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.