Home बीड लाकडी घाणा तेल उत्पादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा.राजेंद्र बरकसे

लाकडी घाणा तेल उत्पादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा.राजेंद्र बरकसे

183

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)

बीड(दि.26मार्च):-महाराष्ट्र राज्य लाकडी घाणा तेल उत्पादक संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी गेवराई येथील संताजी तेल भांडारचे संचालक प्रा. राजेंद्र रंगनाथराव बरकसे यांची तर उपाध्यक्ष म्हणून संतोषराव केंद्रे (धारूर )यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोंदणीकृत असलेल्या महाराष्ट्र राज्य लाकडी घाणा तेल उत्पादक संघाचे अध्यक्ष ओंकार एकशिंगे यांनी रविवारी ही नियुक्ती जाहीर केली.

राज्य संघाची पुणे येथे जेष्ठ समाजसेवक सुरेंद्र दळवी ,संतोषसेठ माकुडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक होऊन संघ निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली. प्रा.राजेंद्र बरकसे हे उद्योजक पत्रकार, साहित्यीक, कलावंत असून कला, क्रीडा, आरोग्य ,सामाजिक, सांस्कृतिक ,संगीत आदी क्षेत्रामध्ये सक्रीय आहेत .मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने त्यांची रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केली होती . जिल्हा न्यायालयाने त्यांची नुकतीच विधीदूत म्हणून नियुक्ती केली आहे . म .रा . मराठी पत्रकार परिषदेने नुकतीच जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारीही दिली आहे.

बीड जिल्ह्यात लाकडी घाणा व त्यातून तयार होणारे शुद्ध तेल, पेंड, भुस्सा, उत्पादन व विक्री तसेच मार्केटिंग करण्याच्या उद्देशाने समन्वय करून प्रगती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य लाकडी घाणा तेल उत्पादक संघाने बीड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. प्रा .बरकसे यांना नुकतेच जय मल्हार प्रतिष्ठानने यशवंतरत्न राज्य स्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे . अनेक पुरस्कार व गेल्या ३५ वर्षातील विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन लाकडी घाणा तेल उत्पादक संघाने बीड जिल्हा अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी त्यांना दिली आहे .

या निवडीबद्दल समाजभूषण अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्य सचिव विजयभाऊ चौधरी ,महाराष्ट्र प्रांतिक महासभा युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर, सुरेंद्र दळवी, संतोष माकुडे, प्राचार्य अरुण भस्मे, राज्य मागास आयोगाचे माजी सदस्य डॉ. भूषण कर्डिले, लाकडी घाणा तेल उत्पादक संघाचे अध्यक्ष ओंकार एकशिंगे(पुणे), उपाध्यक्ष स्नेहल राऊत (मुंबई ), सचिव प्रतिक निरभवणे ( नाशिक ) एकनाथ हात्ते (नांदेड ) , अशोक मिटकर ( छत्रपती संभाजीनगर ),रोहित तांबे, नगर जिल्हाध्यक्ष विजय लोखंडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष संदीप कापसे, धाराशिव जिल्हाध्यक्ष मयूर दुमाणे, ऋषिकेश चिल्लरगे, अखिल तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव लोमटे , उपाध्यक्ष सुरेशअप्पा राऊत ,तालुका अध्यक्ष पांडुरंगमामा पन्हाळे, स्व. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजय मगर, माजी नगरसेवक गोरखनाथ शिंदे , विभागीय सचिव धर्मराज करपे, ह.भ.प. कैलास महाराज गवळी, कृषि ऊ.बा.समितीचे माजी संचालक अरुण वाघमारे, भवानी बँकेचे माजी संचालक चंद्रकांत शिंदे ,सम्राट तेली,उद्योजक कैलास टोणपे, सुरेश कर्डिले, साई शेलार, मनोज सन्तासे, शिवाभाऊ महाले, डॉ. विजय दळवी, प्रदिप राऊत, संतोष देशमाने, महेश काकडे, ज्योतीराम घुले, तापडिया, सुभाषअण्णा गायगवे, जोगदंड,कृषि अधिकारी नितीन राऊत, विधिज्ञ दीपक राऊत, सुनिल सोनवणे, गोकुळ सोनवणे, समाजबांधव, मित्र परिवार, पत्रकार बंधू, कलावंत – साहित्यीक आदींनी नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here