Home महाराष्ट्र अवैध दारू आणि कर्ज वाटप प्रकरणी आ.डॉ.गुट्टे विधानसभेत कडाडले

अवैध दारू आणि कर्ज वाटप प्रकरणी आ.डॉ.गुट्टे विधानसभेत कडाडले

209

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26मार्च):-अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करतात. मात्र, त्याला लगेच जामिन मिळतो. त्यामुळे तो पुन्हा जोमाने दारू विकतो. परिणामी, गंगाखेड विधानसभेच्या कार्यक्षेत्रात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री विषयी शासन कडक कायदा करणार आहे का? अशा शब्दात गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तरांच्या तासात ते बोलत होते. पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे यांनी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर बोट ठेवले. एखाद्या कर्जदाराने संबंधित बँकेतून जर १ लाख रूपये कर्ज घेतले तर त्यातील ४० हजार रूपयांची रक्कम परत का घेतली जाते? तसेच कर्ज वाटप करताना संचालक मंडळ वशिलेबाजीला प्राधान्य देत आहे. त्यातून खरे गरजू डावलले जात आहेत. म्हणजे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे बँकेच्या कारभाराची आणि कर्जदारांकडून कर्जातील रक्कम परत घेणाऱ्यांची चौकशी होणार का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आ.डॉ.गुट्टेंनी उपस्थित केलेले प्रश्न आणि आक्रमकता पाहून अवैध दारू प्रश्नी मंत्री शंभूराजे देसाई यांनी कायदे कडक आहेत. परंतु गरज पडल्यास नवीन कायदा करण्याबद्दल गृहविभागाशी चर्चा करू तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज प्रकरणी सहकार मंत्री सहकार मंत्री ना.अतुल सावे यांनी देऊन चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भविष्यात सरकार नेमके कोणती उपाययोजना करेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.दरम्यान, आ.डॉ.गुट्टे यांनी अवैध दारू आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वाटप प्रकरणातली मनमानी शासनाच्या समोर मांडल्याने महिला व शेतकरी यांना आनंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here