✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.19मार्च):- तालुक्यातील माटेगाव येथे शनिवार (दि, 18 मार्च) रोजी झालेल्या वादळ वाऱ्यासह गारपीटीमध्ये वीज कोसळल्याने लिंबाच्या झाडाला तडका बसून साल पूर्ण उध्वस्त झाली आणि शेतकऱ्यांनी लाईटीसाठी सोलर प्लॅन घेतला होता त्यात तो देखील पूर्ण जळाला असून इन्वर्टर सोलर पूर्ण विजेमुळे निस्तनाबूत झाले ही घटना आज दिनांक 18 मार्च रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील माटेगाव येथील दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माटेगाव कुभेजळगाव रोड वरील गरुड ज्ञानदेव दादाहारी यांचा विज पडून सोलर अनि इनव्हेंटर जळाले लाईट पुर्ण बन्द पडली आहे.
यामध्ये यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तात्काळ पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे ही घटना गरूड वस्तीवर झाली असून सुदैवाने कुठलेही जीवित हानी झाली नाही परंतु यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असुन भयभीत वातावरण निर्माण झाले आहे.