✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.18मार्च):- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वारंवार प्रसारमाध्यमाशी बोलताना जुन्या पेन्शन संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे, आणि त्यास जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर जुनी पेन्शन योजना लागू करणार असे महाराष्ट्रातील तमाम जनतेस आश्वासन सुद्धा दिले आहे.
वंचित बहुजन आघाडी तालुका पुसद च्या वतीने विविध कर्मचारी संघटनांनी मागील पाच दिवसापासून जे जन आंदोलन उभे केले आहे त्यास वंचित बहुजन आघाडीची तालुका कार्यकारणी, शहर कार्यकारणी व महिला कार्यकारणी त्यांनी प्रत्यक्षात आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शविला.
पाठिंबा दर्शविताना वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, शहर महासचिव अरुण राऊत, शहर संघटक मधुकर सोनवणे, विद्याताई नरवाडे, दीपा हराळ,प्रयाग ताई थोरात, सायाबई हरणे,मथुरा भगत, अर्चना शिंदे, छाया राठोड,विजय शेलार, बालाजी तुंडलवार, अफजल खान, अजय जाधव, अजय पाईकराव, शुभम पाईकराव, शंकर शेंडे, प्रशांत शेलार, रंजीत राठोड, सुशील राठोड, राजेश राठोड इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.