✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.18मार्च):- अमरावती जिल्ह्यात सुरु असलेले सरकारी कर्मचारी यांचे आंदोलन तीव्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत आणि एकच मिशन जुनी पेंशन या नाऱ्यांनी आपल्या मागण्या, भावना सरकारला कडाव्या यासाठी नारे देत आहेत. पण एकीकडे या मागण्या सुरु असतांना याला विरोध होत आहे की यांना लाच पाहिजे पगार पाहिजे आणि पेन्शन ही. तर थोडक्यात सर्व कर्मचारी तसे नसतात १००% पैकी १% जर लाच घेताना दिसले असेल,सापडले असेल तर सर्व कर्मचारी वर्गाला हा दोष देणे योग्य नाही.
काही जाणीवपूर्वक पेंशन ला विरोध करत आहेत वयाचे ६० वर्ष होइपर्यंत जनतेची सेवा करणारा कर्मचारी रिटायर्ड झाल्यावर कोणते काम करेल, सर्वांना सांभाळणारे असतात असे नाही त्या वयात कोणतेही काम करणे शक्य होत नाही. म्हणून विरोध करणाऱ्यांनी हे समजून घ्यावं व सरकारी कर्मचारी वर्गाचा लढा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. बी एस एफ ग्रूप चे भूषण सरदार यांनी प्रत्यक्षात भेट देऊन त्यांच्या या लढयाला समर्थन दिले. समृद्धी महामार्गांवर हजारो करोड खर्च केल्यापेक्षा जे महत्वाचे आहे ते जुनी पेंशन योजना सरकारने सुरु करायला हवी. आताही वेळ गेलेली नाही. शासनाने लवकर निर्णय घेऊन जुनी पेंशन सुरु करावी अन्यथा येणाऱ्या काळात सरकारी कर्मचार्यांचे आंदोलन देशव्यापी होईल यात शंका नाही.