Home महाराष्ट्र लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी कडुन मोतिबिंदू शिबिर संपन्न

लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी कडुन मोतिबिंदू शिबिर संपन्न

131

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17मार्च):-लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी कडुन दि 16 मार्च रोजी राजेश्वर फंक्शन हॉल, डि पी रोड गंगाखेड येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.या शिबिरात 200 पेक्षा जास्त रुग्नांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 35 रुग्णांना नांदेड लॉयन्स आय हॉस्पिटलमध्ये पुढील शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लॉ. नंदकुमार पटेल तर प्रमुख पाहुणे म्हणून लॉ. उमाकांत कोल्हे, लॉ. डॉ अनिल बर्वे, लॉ. अध्यक्ष गोविंद रोडे, कोषाध्यक्ष संजय सुपेकर, लॉ मदन शिंदे , लॉ. जगन्नाथ आंधळे, लॉ. जगदीश तोतला उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटक लॉ. नंदकुमार पटेल यानी मनोगत व्यक्त करताना लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी ने प्रथम वर्षात जे सामाजिक उपक्रम राबवले त्यामुळेच जालना येथील शिखर परिषदेमध्ये तब्बल 9 अवार्ड मिळाले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विष्णू मुरकुटे, प्रास्ताविक भगत सुरवसे आभार प्रदर्शन गोपाळ मंत्री यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे कॅबिनेट ऑफिसर अतुल गंजेवार, संचालक अभिनय नळदकर , बंडु घुले , प्रकाश घण, नागेश केरकर, अभिजित चौधरी, महेंद्र कांबळे, महेंद्र वरवडे, विठ्ठल शिंदे, चंद्रकांत गादेवार, शिवम गिरी, कृष्णा पतंगे, सदानंद पेकम, सोनु सिंग ठाकुर तसेच लॉयन्स क्लब लेडीज फोरम च्या राणीताई राखे, माधुरीताई गंजेवार यानी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here