Home महाराष्ट्र जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप-तिसऱ्या दिवशी कार्यालये ओस पडली,कार्यालयात शुकशुकाट

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप-तिसऱ्या दिवशी कार्यालये ओस पडली,कार्यालयात शुकशुकाट

183

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.16मार्च):-जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार राज्यातील १८ लाख कर्मचारी संपावर गेले आहेत.संपाच्या तिसऱ्या दिवशी चिमूर तालुक्यात राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक संपावर गेले असून बहुतेक शाळा बंद आहेत.सरकारी कार्यालये ओस पडली आहेत.

कार्यालयात शुकशुकाट आहे.या संपासंदर्भात शासनाकडे ज्या मागण्या केल्या आहेत. जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्यात यावी या मागणीसह नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करण्यात यावे, सरकारी कामकाजातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, वस्तीशाला शिक्षकांना मूळ नियुक्ती दिनांकापासून वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, सावित्री फातिमा कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात यावी, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा.

शिक्षकांना अशैक्षनिक कामे देण्यात येऊ नये, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध लागू करुन भरती सुरु करण्यात यावी, निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करण्यात यावे, अनुकंपा तत्वावर नियुक्त्या तात्काळ देण्यात याव्या, पंधरा दिवसांची पितृत्व रजा आणि केंद्रप्रमाणे राज्यातील पुरुष व महिला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आहे.जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संपाच्या तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालयासमोर एकत्र येऊन कर्मचाऱ्यांनी शासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संपात उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.जे कर्मचारी संपात सामील झाले नाही त्यांनी संपात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here