Home महाराष्ट्र मोबाईलच्या अति वापरामुळे संसारात पडतेय विघ्न

मोबाईलच्या अति वापरामुळे संसारात पडतेय विघ्न

160

✒️वरोरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वरोरा(दि,12मार्च):-भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूर येथील शिष्टमंडळ यांनी अमोल काचोरे पोलीस निरीक्षक वरोरा यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, मोहन जिवतोडे, प्रदीप गोविंदवार, डॉ दिनकर गज्जालवार, सुदर्शन नैताम, वसंता भलमे, प्रशांत मडावी, सचिन बरबटकर, गंगाधर गुरनुले, पिंटू मुन आदी उपस्थित होते.

हजार गुन्हेगार सुटले तरीही चालेल परंतु एकाही निरअपराध व्यक्तीला सजा होता कामा नये असे न्यायव्यवस्था म्हणते.परंतु महिला संरक्षणाकरिता असलेल्या कायद्याचा फार मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे त्यात हुंडाबळी, गृहहिंसाचार, पोटगी, घटस्फोट, बलात्कार, मिटू इत्यादी प्रकरणात खोट्या तक्रारी होत आहे व निर्दोष लोकांचे कुटुंब विस्कळीत होत आहे.

यावर आळा बसणे गरजेचे आहे. अन्यथा कुटुंबव्यवस्था मोडकळीस येईल यात महत्त्वाची भर पडते मोबाईल मुळे. सध्या कुटुंबात वाद होण्याचे मुख्य कारण मोबाईल आहे. मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे सुद्धा कुटुंब तुटते व पती-पत्नी विभक्त होताना दिसते. बऱ्याच कुटुंबात पती-पत्नीला संसार तुटत आहे हे दिसत असताना सुद्धा मोबाईलचा वापर कमी करावा असे वाटत नाही त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहेत आणि मुलांचे भविष्य अंधाकरमय होत आहे या विषयावर माननीय पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांच्याशी सविस्तर व सकारात्मक चर्चा पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here