


🔸मुलींनी साकारल्या विविध कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा !…
🔹शिक्षकांनी केला शाळेतील शिक्षिकांचा सत्कार !….
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.8मार्च):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सर्वात प्रथम विविध कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील उपशिक्षक श्री.संजय गायकवाड यांनी शाळेतील मुख्याध्यापिका सौ.रजनी सुरमारे व उपशिक्षिका श्रीमती वैशाली वाणी यांचा ब्लाउज पीस व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
त्यानंतर कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा शाळेतील विद्यार्थिनींनी साकारल्या. प्रत्येकाने आपल्या कार्याचा परिचय दिला. उपशिक्षक संजय गायकवाड यांनी महिला दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय गायकवाड यांच्यासह मुख्याध्यापिका सौ.रजनी सुरमारे व उपशिक्षिका वैशाली वाणी यांनी परिश्रम घेतले.













