✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि. 5 मार्च):-येथील बाळदी रोड आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे दारू पिण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत झुडपात मृतदेह आढळून आल्याची घटना बाळदी रोड आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे दि 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
उमरखेड तालुक्यातील बाळदी येथील रहिवाशी गोपाल सुधाकर मिरासे वय 25 वर्षे असून दि .1 मार्चपासून बेपत्ता होता.
गोपाल सुधाकर मिरासे वय 25 वर्ष रा बाळदी ता उमरखेड असे मृतकाचे नाव आहे.
अशी गावकऱ्यांकडून ओळख पटली असता तो दिनांक 1 मार्च पासून बाळदी येथून गेला होता नंतर परत न आल्याने घरच्या लोकांनी उमरखेड पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रारी दिली होती.
आज दि 5 मार्च रोजी आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे परिसरातील एक व्यक्ती शौचास गेला असताना रविवारी सकाळी 11 च्या दरम्यान झुडपातून दुर्गंधी येत होती ही माहिती त्या नागरिकांनी उमरखेड पोलिसांना दिली त्याच क्षणी उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले तेव्हा झुडपात कुजलेला मृतदेह आढळून आला पोलिसांना गावकऱ्यांच्या सहकार्याने ओळख पटली असता मृतदेह गोपाल मिराशेचा असल्याचे पुढे आले.
मृतदेह उत्तरी तपासणीसाठी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल माळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सी.एम. चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड करीत आहे.अद्यापही मृत्यूचे कारण कळाले नसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .