Home महाराष्ट्र राष्ट्रीय सेवा योजना शिबिर नीतीमूल्यांची शिकवण देणारी शिदोरी – अनंत सोमवंशी

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर नीतीमूल्यांची शिकवण देणारी शिदोरी – अनंत सोमवंशी

59

🔹डोंगर यावली येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.26फेब्रुवारी):-भारतीय विद्यामंदिर,अमरावती द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय मोर्शी च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजीत दत्तक ग्राम डोंगर यावली येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उदघाटन समारंभ संपन्न झाला.आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. महाविद्यालयीन स्तरावर आयोजित केलेले जाणारे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर विद्यार्थ्यांना नीतीमूल्यांची शिकवण देणारी शिदोरी असते, असे प्रतिपादन भारतीय विद्या मंदिराचे सरचिटणीस अनंत सोमवंशी यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनंतराव सोमवंशी सरचिटणीस, भारतीय विद्दा मंदिर, अमरावती यांनी भूषविले उदघाटक म्हणून मा.सुखदेवराव राऊत, प्राचार्य डॉ. आर. बांबोळे, प्रमुख अतिथी म्हणून सरपंच भाग्यश्री केचे, उप सरपंच कांचन कुकडे, वनश्री पांढरे, पदमा कुमरे, अरुण राऊत, प्रतिभा पांडे, अंजली राऊत, सुनील साबळे , डॉ. संदीप राऊत, प्रा.घनश्याम दाणे यासह आदी मंडळींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. भगवान साबळे यांनी केले.

सूत्रसंचालन डॉ. एल. आर. टेंभुर्णे यांनी तर आभार प्रा. गोपाल भलावी यांनी मानलेत. या कार्यक्रमास प्रा. दीपक काळे, प्रा.विनायक खांडेकर, डॉ.सावन देशमुख, डॉ.शिरीष टोपरे,प्रा. मनीष गुडधे, प्रा.रामदास इंगळे, प्रा. अश्विनी हूड, डॉ. दीपाली देशमुख, प्रा. ज्योती मरसकोल्हे, श्री रूपेश मेश्राम,श्री पुरोहित सर तसेच डोंगरयावली येथिल ग्रामस्थ व रासेयो विद्दार्थी प्रतिनिधी अनिकेत भुयार, विद्दार्थीनी प्रतिनिधी कु.आकांक्षा कडू व रासेयो स्वंयसेवक उपस्थित होते. या सात दिवसीय श्रमसंस्कार शिबीरप्रसंगी श्रमदानासोबतच प्रार्थना, योगासन, प्रभातफेरी, बौद्धिक व्याख्यान, आरोग्यविषयक शिबीर, रक्तदान शिबीर, प्रबोधनानात्मक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या शिबीराबाबत शिबीरार्थी विद्दार्थ्यामध्ये कमालीची उत्सुकता आहे. हे शिबीर दि. २ मार्च २०२३ पर्यंत संपन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here