Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ संपन्न

125

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.25फेब्रुवारी):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे’ आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात माजी शिक्षणमंत्री कै. ना.अक्कासो सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील व संस्थापक अध्यक्ष कै. ना. दादासाहेब सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाला महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून चोपडा येथील MSEB चे उपकार्यकरी अभियंता निलेश एस.रासकर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी मंडळाचे सदस्य बाजीराव वामनराव पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नियामक मंडळाचे सदस्य यशवंतजी खैरनार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विश्वनाथ अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा. एन. एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी. एम. पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सुर्यवंशी यांनी केले तर अहवाल वाचन पारितोषिक वितरण समिती प्रमुख डॉ.ए.बी. सुर्यवंशी यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या अहवालात वाचनात महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी, महाविद्यालयातील विविध सोयी सुविधांविषयी, महाविद्यालयात चालवले जाणारे विविध उपक्रम जसे की मेंटर-मेंटी उपक्रम, केक-फ्री कॅम्पस, वाचन संस्कृती अभियान महाविद्यालयाच्या यशाच्या शिखरावरचा चढता आलेख आपल्या अहवाल स्वरूपात सादर केला.
या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक उपकार्यकरी अभियंता निलेश एस.रासकर आपले उदघाटनपर मनोगत व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयाचा परिसर व वातावरणाचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना समाजातील विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्यक्तींचे उदाहरण देऊन प्रोत्साहित केले व यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील विविध खेळ, क्रीडा, कलागुण, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी विभाग व संपूर्ण शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन जवळपास ७० विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते गौरविण्यात करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांनाकार्यकारी मंडळ सदस्य बाजीराव वामनराव पाटील म्हणाले की, परीक्षा हे तंत्र आहे. ते आत्मसात करण्यासाठी अभ्यास, जिद्द व चिकाटी हे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी असणे आवश्यक आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा. यावेळी संस्थेबद्दल असलेले प्रेम व जिव्हाळा त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. एच. जी. सदाफुले, सौ.अनिता सांगोरे व श्रीमती एस.बी.पाटील यांनी केले तर आभार श्री. पी.एस.पाडवी यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.पी.के. लभाने, डॉ. के डी. गायकवाड, डॉ. के. एस. भावसार, व्हि. पी. हौसे, डॉ. सी. आर. देवरे, डॉ. व्हि.आर.हुसे, सौ. के. एस. क्षिरसागर, डॉ.व्हि आर.कांबळे, वाय.एन.पाटील, एम. बी. पाटील, डॉ.आर.आर.पाटील, आर. इ. लांडगे, पी.आर पाटील, एन. बी. पाटील, भरत बी. भालेराव, जी.एम. राठोड, विजय शुक्ल यांनी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी बंधू -भगिनी यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here