Home महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय अंजनविहिरे येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व व्याख्यान संपन्न

माध्यमिक विद्यालय अंजनविहिरे येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व व्याख्यान संपन्न

162

🔹विद्यार्थ्यांनो आपले उत्तम नियोजन आपल्याला ध्येयापर्यंत पोहचवते – युवा वक्ते सतिष शिंदे सर

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.25फेब्रुवारी);-रोजी माध्यमिक विद्यालय अंजनविहिरे विद्यालयात इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाराष्ट्र न्यूज 21 चे संपादक श्री सतीश शिंदे सर हे होते .तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एकनाथ पाटील सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी प्रतिमेचे दीपप्रज्वलन केले .

तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सरस्वती देवीची मूर्ती विद्यालयास सप्रेम भेट देण्यात आली .तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांकडून गुरुजनांच्या सत्कार करण्यात आला . विद्यार्थ्यांमधून कुमारी सलोनी भाऊसाहेब चव्हाण , आकाश दोडे व विजय श्रावण कोळी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील उपशिक्षक श्री अनिल मनोरे सर यांनी केले.तसेच शिक्षकांमधून श्री राजेंद्र पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना यशाचे मंत्र याविषयी मार्गदर्शन केले.तसेच विद्यालयातील उपशिक्षक श्री विजय पवार सर यांनी संकटांवर कसे मात करायचे याविषयी त्यांनी अधिक माहिती विवेचन केली.

विद्यालयातील मुख्याध्यापक आदरणीय श्री एकनाथ पाटील सर यांनी विद्यार्थ्यांसमोर यशस्वी व्यक्तिमत्त्वांचे विचार प्रकट केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा वक्ते सतीश शिंदे सर यांनी शिवाजी महाराज जीवनात कसे यशस्वी झाले तसेच अडचणीवर कशा पद्धतीने मात केले याविषयी सखोल विद्यार्थ्यांना माहिती देऊन आपण आपल्या जीवनात यशवंत कसे व्हावे याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी पवार या विद्यार्थिनीने केले तर विद्यालयातील कविता गोरख शिरसाट या विद्यार्थिनींनी आभार मानले कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here