Home महाराष्ट्र सत्कारमूर्ती आ.डॉ.गुट्टे भावुक : ग्रामस्थांचे आभार

सत्कारमूर्ती आ.डॉ.गुट्टे भावुक : ग्रामस्थांचे आभार

120

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21फेब्रुवारी):-जिल्हा रस्त्यास राज्य महामार्ग दर्जा मिळवून देत रस्ते दुरुस्तीची मंजुरी मिळवून आणल्यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या जाहीर सत्कार प्रसंगी बोलताना उत्तर देताना, मनात एक घर बांधू, त्या घराला दार‌ कशाला? अशा काव्यमय शब्दात आ.डॉ.गुट्टे यांनी आपली भावना मांडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागरिकांचे दळणवळण सुरळीत व्हावे, यासाठी गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या अथक परिश्रमातून बोथी ते चाटोरी हा जिल्हा मार्ग दर्जोन्नत होऊन त्यास राज्य महामार्ग क्रमांक ४४४ करण्यात आले आहे. तसेच त्या रस्त्यांची दुरुस्ती व आवश्यक त्या कामासाठी शासनाने मंजुरी सुध्दा दिली आहे. त्यामुळे ‘त्या’ मार्गावरील बोरगांव (बु), बेंडकी तांडा, सोनेरी तांडा अशा तीन ठिकाणच्या सर्व ग्रामस्थांनी मिळून मौजे.बोरगाव येथील श्री.महारुद्र मंदिराच्या प्रांगणात आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला.

याप्रसंगी भावुक झालेल्या आ.डॉ.गुट्टे यांनी आयोजकांचे जाहीर आभार मानले. मी तुमचा फक्त सेवक आहे. त्यामुळे तुमची सेवा करताना मी कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही माझे कुटुंब आहात. त्यामुळे, ‘आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, मनात एक घर बांधू, त्या घराला दार कशाला… कवी संजय चौधरी यांच्या कवितेचा आधार घेत असे भावनिक उदगार आ.डॉ.गुट्टे यांनी काढले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे,मित्रमंडळाचे गंगाखेड तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, चाटोरीचे सरपंच आण्णासाहेब किरडे, डॉ.शिवाजी कदम, बोरगावचे सरपंच दिपक शिंदे, उपसरपंच रोहिदास कदम यांच्यासह तीनही गावातील भजनी मंडळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र बैकरे तर सूत्रसंचालन पत्रकार गुणवंत कांबळे यांनी केली. रोहीदास कदम यांनी आभार मानले.

म्हणून बॅकलॉग भरुन निघतोय – रामप्रसाद सातपुते
मतदार संघाचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. तरीही साहेब मोठ्या हिमतीने लढा देत आहेत. राज्य आणि केंद्र शासनाकडून निधी आणून शेकडो प्रश्न मार्गी लावीत आहेत. त्यांच्या सारखा जिद्दी, कणखर आणि खमक्या लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघास मिळाल्यामुळे गेल्या ४० वर्षांचा बॅकलॉग भरुन निघतोय. म्हणून आपण सावली सारखे त्यांच्या पाठीशी कायम असायला हवे, असे आवाहन मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते यांनी उपस्थितांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here